शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कणकवलीत पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध, शिवसेनेकडून रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:09 IST

पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकणकवलीत पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीचा निषेधशिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन वैभव नाईक यांची उपस्थिती

कणकवली : पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकानी पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातच ठाण मांडले.कणकवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून महामार्गावरून चालत जात शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकानी पू.अप्पासाहेब पटवर्धन चौकातच ठाण मांडले. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांची कोंडी झाली होती.त्यामुळे पोलिसांनी या रास्ता रोको आंदोलनात हस्तक्षेप करीत सर्व शिवसैनिकाना ताब्यात घेतले.तसेच त्यांना व्हॅनमधून पोलिस स्थानकात नेले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.या आंदोलनात आमदार वैभव नाईक यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख अड़. हर्षद गावडे, राजू राठोड, भुषण परुळेकर , सिध्देश राणे, महेश देसाई,संजय ढेकणे, बाळू मेस्त्री, अरुण परब, नगरसेविका मानसी मुंज,माहि परुळेकर , साक्षी आंबडोस्कर, प्रतीक्षा साटम, अनुप वारंग, नासिर खान, कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, राजन म्हाड़गुत, सुजीत जाधव, संजय पारकर, बाळू पारकर, भालचंद्र दळवी ,योगेश मुंज , तेजस राणे, समीर परब आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

मुंबई -गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी !या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'कहा गये..कहा गये..अच्छे दिन कहा गये, कब मिलेंगे.. कब मिलेंगे.. 15 लाख कब मिलेंगे ', अशा घोषणा देत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. आकाशाला भिडलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. सलग 13 दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. त्याबद्दल तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.भगवे झेंडे तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक शिवसैनिकानी हातात घेतले होते. पेट्रोल , डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे असे लिहिलेले फलकही शिवसैनिकांच्या हातात दिसत होते. बाळू मेस्त्री तसेच काही शिवसैनिक सायकलवर बसून या आंदोलनात सहभागी झाले होते.कड़क पोलिस बंदोबस्त !या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक Petrolपेट्रोल