शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कायमस्वरूपी उपायाचा प्रयत्न

By admin | Updated: May 20, 2015 00:15 IST

जिल्ह्यातील वाळूप्रश्न : विनायक राऊत यांचे आश्वासन

कणकवली : जांभ्या दगडाचा प्रश्न निकाली निघाला आहे. वाळू उत्खननावर हरित लवादाचे निर्बंध आड येत आहेत. तसेच एमएमबी बोर्डाकडे लिलावासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे आम्ही कोकणातील आमदारांची बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाय काढण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. एमएमबी बोर्डाचे अधिकार महसूलकडे द्यावेत. बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा खाडीपट्ट्याचा लिलाव करेल, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाकडून हरित लवादाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. आवाज फाऊंडेशनने काढलेल्या त्रुटींसंदर्भात राज्यशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हरित लवादाने वाळूपट्टे लिलावाला मान्यता दिल्यानंतर महसूल यंत्रणेकडून लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. वाळू माफियांमुळे राज्यात मांडलेल्या उच्छादामुळे राज्यात एमपीईडी अ‍ॅक्ट लागू झाला. या अ‍ॅक्टचा त्रास कोकणवासीयांना होत असल्याचे खासदार राऊत म्हणाले. त्याचवेळी आरटीआय कार्यकर्ते अधिकाराचा गैरवापर करून प्रशासनाला वेठीस धरत असल्याचेही खासदार राऊत म्हणाले. वाळू उत्खनन हा महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न झाला असून वाळूला पर्याय तयार झाला पाहिजे. तलाठी संघटनेची भेट घेणारवाळू उत्खननासंदर्भात झालेल्या वादात मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यानंतर तलाठ्यांनी आंदोलन पुकारले. ग्रामीण भागातील महसूलची कामे ठप्प झाल्याने तलाठी संघटनेची भेट घेणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. बाजारभावाने मूल्यांकनचौपदरीकरणांतर्गत संपादित केल्या जाणाऱ्या निवासी जागांना बाजारभाव किंवा रेडिरेकनर दर यातील जो जास्त असेल त्याच्या चौपट व व्यावसायिक जागेला दुप्पट दर मिळणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भात खरेदी आठ दिवसातभाताची उचल करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या गोदामांमध्ये साठलेल्या भाताच्या लिलावासाठी दुसऱ्या टेंडरची वाट न पाहता येत्या आठ दिवसांत भात खरेदी सुरू करण्यात यावी, अशी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शून्य प्रहरात स्थानिक प्रश्न मांडलेलोकसभेच्या कार्यकालाविषयी खासदार राऊत यांनी सांगितले की, शून्य प्रहरात १३ वेळा संधी मिळाली. त्यात जास्तीत जास्त मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केले. नियम ३७७ अन्वये मतदारसंघातील प्रश्न ३ वेळा मांडले. वेगवेगळ्या कामकाजात १२ वेळा भाग घेतला, असे राऊत यांनी सांगितले.तारांकित ८ प्रश्न मांडले. २०० अतारांकित प्रश्न मांडले आणि पुरवणी प्रश्नांसाठी १२ वेळा संधी मिळाली. लोकसभेत महत्त्वाची चर्चा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर झाली.