शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

निष्ठेच्या लढाईत जनता माझ्यासोबत राहील : अन्नपूर्णा कोरगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:14 IST

निवडणुका आल्या की भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलते हे मी मागच्या आणि आताच्याही निवडणुकीत अनुभवले आहे. त्यामुळे आता कितीही नोटिसा दिल्या तरी माघार घेणार नाही. माझी लढाई निष्ठावंतांसाठी आहे आणि या लढाईत मला जनतेची साथ आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगांवकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनिष्ठेच्या लढाईत जनता माझ्यासोबत राहील : अन्नपूर्णा कोरगावकरआता निवडणुकीतून माघारीचा प्रश्नच येत नाही

सावंतवाडी : निवडणुका आल्या की भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलते हे मी मागच्या आणि आताच्याही निवडणुकीत अनुभवले आहे. त्यामुळे आता कितीही नोटिसा दिल्या तरी माघार घेणार नाही. माझी लढाई निष्ठावंतांसाठी आहे आणि या लढाईत मला जनतेची साथ आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगांवकर यांनी दिला आहे.त्या सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर, प्रसाद कोरगांवकर, युवा पदाधिकारी अखिलेश कोरगांवकर, विराग मडकईकर आदी उपस्थित होते.कोरगांवकर म्हणाल्या, सावंतवाडीत मागील काही वर्षांत भाजप संघटना वाढीसाठी प्रयत्न केला. पण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मला उमेदवारी नाकारण्यात आली. पण माझ्या मागे त्या प्रभागातील स्थानिक नागरिक होते. त्यामुळे मी त्यांच्या साथीने अपक्ष म्हणून निवडून आले आहे. त्यानंतर मी भाजपला साथ दिली. या माझ्या निष्ठेचे फळ म्हणूनच की काय आताही तेच करण्यात आले. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न असून, यामुळेच मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कोरगांवकर यांनी स्पष्ट केले.मागील निवडणुकीत मला उमेदवारी नाकारण्यात कोण शकुनीमामा होते ते जनतेने बघितले आहे. आताही तेच असतील, असा संशयही कोरगावकर यांनी व्यक्त केला. मात्र, मी घाबरणार नाही. जनतेच्या दारात जाणार आहे. पक्षाने कितीही नोटिसा दिल्या तरी चालतील पण आता माघार घेणार नाही. अलीकडच्या काळात भाजपमध्ये निष्ठावंंतांना डावलण्यात येते, असा आरोपही कोरगांवकर यांनी केला.मी पदावर नाही, माझी हकालपट्टी कशी कराल?भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची नोटीस मला मिळाली. पण मी सध्या पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही, मग माझी हकालपट्टी कशी कराल? असा सवाल करीत माझ्या हृदयात नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान कायम आहे.सामाजिक क्षेत्रातून सर्वांना मदत करेन, असेही कोरगांवकर यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर कोणाला पाठिंबा द्यावा याचा निर्णय जनता घेईल. पण सतत जनतेत जाऊन काम करणार आहे. येथे वेगवेगळे प्रकल्प आणणार असून, महिलांना बचतगटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या हाताला चांगले काम देईन, असेही यावेळी कोरगांवकर यांनी स्पष्ट केले.नगरपालिकेच्या मागील निवडणुकीतदेखील आपल्याला मतदारांनी अपक्ष म्हणूनच निवडून दिले होते. त्यानंतर आपण भाजपाला सहकार्य करण्याचे ठरविले होते. मला त्या निवडणुकीतदेखील तिकीट मिळू नये म्हणून काही लोकांनी काम केले. मात्र, जनतेला मी हवी होते. त्यामुळे जनतेने त्यांना जागा दाखवून दिली.अनेकजण मला सहकार्य करणारभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांनी अन्नपूर्णा कोरगावकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच काही काळ त्यांच्याशी चर्चाही केली. माझे आणि कोरगावकर कुटुंबीयांचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे माझे सतत येणे-जाणे असते. त्यामुळे यांचा राजकीय अर्थ काढू नये, असेही श्यामकांत काणेकर यांनी सांगितले. अजूनही अनेकजण मला सहकार्य करणार आहेत, असे अन्नपूर्णा कोरगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. जनता आपल्यासोबत असल्याचा पुनरूच्चार केला.

टॅग्स :ElectionनिवडणूकMayorमहापौरsindhudurgसिंधुदुर्ग