शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:02 IST

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू ; कोरोनाचे सावट

सुधीर राणे

कणकवली : गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे.गणेश चतुर्थी दिवशी गणरायांची विधिवत स्थापना केल्यानंतर दीड , पाच ,सात , नऊ दिवसांनी अनेक ठिकाणी गणरायांना निरोप देण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सतरा, एकविस दिवसानीही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने समूह संसर्ग रोखण्यासाठी अनेक भाविकांनी दरवर्षी पेक्षा लवकर गणरायाना निरोप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.सिंधुदुर्गात महालयांना विशेष महत्त्व असते. पितृ पंधरवड्यात आपल्या मृत कुटुंबीयांच्या नावे तिथीनुसार पिंडदान करुन पितरांच्या आत्मांना शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. तर पितरांच्या नावाने नातेवाईक व ग्रामस्थांना महाप्रसाद वाढला जातो. पितृपक्ष कालावधीत पितर धरतीवर येतात, त्यांना तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे.यावर्षी २ सप्टेंबर पासून महालयानां प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लोकांना महालयाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कमी लोकांच्या उपस्थितीत महालय कसे करायचे ? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

त्याचप्रमाणे पुरोहित उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे पुरोहित उपलब्ध न झाल्यास पर्यायी व्यवस्था काय करायची ? याबाबत जुन्या जाणत्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.महालयासाठी आवश्यक सामानाची यादी बनवून ते खरेदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करणे सध्या सुरू आहे. तर गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी आलेले अनेक मुंबईकर महालय करुनच परतणार आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.भाजीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता !महालयांमध्ये अन्नदानाला जास्त महत्व असते. यावेळी करण्यात येणाऱ्या भोजनात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत भाजी, फळे यांच्या किमतीत वाढ झाली होती. आता परत महालयांच्या कालावधीत पुन्हा भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग