शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या भूलथापाना जनतेने भुलू नये, प्रमोद जठार यांचे आवाहन

By सुधीर राणे | Updated: February 2, 2024 16:30 IST

विनायक राऊत यांनी प्रकल्पांना विरोध केल्याने बेरोजगारी वाढली 

कणकवली: उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत. येथे येणाऱ्या प्रकल्पांना ठाकरे आणि खासदार विनायक राऊत यांनी विरोध करून एकप्रकारे ते प्रकल्प समुद्रात बुडविले. येथील तरुणांना रोजगारापासून मुकावे लागले. आता जनतेने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांचा पराभव करून त्यांनाच समुद्रात बुडवावे. तसेच प्रकल्पांना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या  भुलथापाना जनतेने भुलू नये, असे आवाहन भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलू सावंत उपस्थित होते.जठार म्हणाले, प्रत्येक प्रकल्पाला खासदार विनायक राऊत विरोध करतात. नवीन कुठलाही प्रकल्प आला की, ते आणि उद्धव ठाकरे हे आम्हाला विश्वासात घ्या,असे म्हणतात. याचा अर्थ काय? रोजगार उपलब्ध  नसल्याने तरुणांना बाहेर गावी जावे लागत असल्याने कोकणातील ८० टक्के घरे बंद आहेत. रिफायनरी प्रकल्प व्हावा,यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र, एकदा राऊत यांना विचारले, तुम्ही रिफायनरीचा अभ्यास केला का? त्यावर ते म्हणाले लोकांना नको असेल तर आमचा त्याला विरोध राहील. आमदार राजन साळवी, आदित्य ठाकरे सांगताहेत की, हा प्रकल्प हवा. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्प करावा म्हणून मुख्यमंत्री असताना केंद्रशासनाला पत्र दिले आहे. मग फक्त राऊतांचाच त्याला विरोध का? असा प्रश्न प्रमोद जठार यांनी उपस्थित केला.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी,कोल्हापूर या भागातील काजू बीला २०० रुपये हमी भाव द्यावा, या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्याबाबतची बैठक सर्व मंत्र्यांच्या उवस्थितीत पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काजू बी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना येणारा उत्पादन शुल्क लक्षात घेवून सरकारने हमी भाव द्यावा, भावांतर म्हणून तरतूद करावी अशी आम्ही मागणी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेPramod Jatharप्रमोद जठार