शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, केवळ उद्घाटना पुरताच संबंध; मनसे नेते परशुराम उपरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:05 IST

विमानतळावरील गैरसोयींकडे ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत आहेत. केवळ उद्घाटना पुरताच यांचा विमानतळाशी संबंध होता,

कणकवली : श्रेयवादात अडकलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे अखेर पूर्णत्वास गेले आहे. परंतु  सहा महिने होत आले तरीही विमानतळावरील गैरसोयींकडे ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत आहेत. केवळ उद्घाटना पुरताच यांचा विमानतळाशी संबंध होता, अशी टीका मनसे सरचिटणीस परशराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे पर्यटनासाठी इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे पर्यटकांची येथे गैरसोय होत आहे. देवगडमधून निघालेला एखादा प्रवासी असेल तर त्यांना खाद्य पदार्थ किंवा एखादी पाण्याची बाटलीही मिळत नाही. ही खरेच शोकांतिका आहे.तसेच विमानामध्ये खाद्य पदार्थ विकतही दिले जात नाहीत. त्यामुळे चार ते साडेचार तास प्रवाशांना उपाशी प्रवास करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. याकडे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. केवळ विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले हेच ते जनतेला दाखवत आहेत.राज्य सरकारने विमानतळासाठी वीज, पाणी, रस्ता या सोयी पूर्ण करण्याचे करारामध्ये लिहिले आहे. परंतु त्या सोयीदेखील पूर्ण केल्या गेल्या नाहीत. चार वर्षांपूर्वी तेजस एक्सप्रेस मध्येही खाद्य पदार्थ दिले जात नव्हते. या विषयी रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठपुरावा केल्यानंतर चिपळूणच्या पुढे खाद्य पदार्थ देण्यास सुरुवात झाली. या साऱ्या गोष्टींचा पर्दाफाश आम्ही लवकरच करणार आहोत, असा इशारा परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Airportविमानतळ