शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंची दुटप्पी भूमिका जनतेला माहीत - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Updated: March 8, 2024 15:57 IST

मुंबईस्थित चाकरमान्यांचा १३ मार्चला शिवसेना भवनात मेळावा

कणकवली: भाजपच्यावतीने हिंदुत्वाची सगळीच जबाबदारी मीच घेतली आहे,असे नितेश राणे भासवत आहेत. त्यांचे हे सगळे मंत्रिपदासाठी नाटक आहे.त्यामुळेच त्यांच्याच वरवडे गावातून मुस्लिम समाजाने राणे यांच्यापासून फारकत घेतली आहे.जिल्ह्यात एक व जिल्ह्याबाहेर एक अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत.हे सगळे जनता जाणून आहे.  अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.कणकवली येथील विजय भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अनुप वारंग आदी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रचाराबाबत कोकणातील मुंबईस्थित चाकरमान्यांचा मेळावा १३ मार्च रोजी मुंबई येथे शिवसेना भवन कार्यालयात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी राणेंच्या वरवडे गावातील मुस्लिम बांधवानी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार राऊत यांच्या समोर उमेदवार कोण आहे ? हे अजून निश्चित नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे जरी लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तरी कोणताही फरक पडणार नाही. लोक महागाईने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लोकांना आता केंद्रातील सत्तेत बदल आवश्यक आहे. नारायण राणे जर उमेदवार असतील तर ही निवडणूक एकतर्फी होवून विनायक राऊतच पुन्हा निवडून येतील असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला. सुशांत नाईक म्हणाले, आमच्या उमेदवारांची प्रचाराची सुरुवात झाली आहे. विनायक राऊतच पुन्हा निवडून येतील. त्यांना कणकवली विधानसभा मतदारसंघात देखील चांगले मताधिक्य असेल. विकास कामांच्या जोरावर विनायक राऊत निवडून येतील. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSandesh Parkarसंदेश पारकर