शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्यटन व्यावसायिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी - बाबा मोंडकर 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 30, 2023 17:35 IST

जलक्रीडा प्रकारांच्या वार्षिक शुल्कात कपात

मालवण (सिंधुदुर्ग) : पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून झालेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जलपर्यटन क्षेत्रात प्रशासन व व्यावसायिक यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन वाढीस मदत होईल, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला.मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील जलपर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाचे मुख्य कार्यालय नरिमन पॉईंट (मुंबई) येथे पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांची भेट घेऊन कोकणातील जलक्रीडा व्यावसायिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.या किनारपट्टीवर स्थानिक नागरिक जलपर्यटनाच्या व्यवसायाशी जोडले जाऊन देश-विदेशातील पर्यटकांना चांगली सेवा देत असल्याने राज्याच्या जलपर्यटन विकासात वाढ होत आहे. परंतु, आपल्या पर्यटन संचालनालयाची अनास्था व चुकीच्या नियम पद्धतीचा त्रास अधिकृत परवानगी घेतलेल्या व पर्यटन व्यावसायिक महासंघाशी संलग्न असलेल्या कोकणातील जलपर्यटन व्यावसायिकांना होत आहे.

असे असणार क्रीडा प्रकारांचे वार्षिक शुल्कचुकीच्या पद्धतीने आकारणी केलेल्या क्रीडा प्रकारांचे वार्षिक शुल्क कमी करून ते पुढीलप्रमाणे राहणार आहे. जेटस्की शुल्क २५ हजार रुपये होते. ते कमी करून १२ हजार रुपये करण्यात आले आहे. बनाना बोट शुल्क १५ हजारवरून कमी करून सात हजार रुपये, बंपर बोट शुल्क १५ हजारांवरून सात हजार रुपये, स्पीड बोट शुल्क ५० हजारांवरून १२ हजार रुपये, नौकाविहार शुल्क ५० हजारांवरून १२ हजार रुपये, कायाकिंग शुल्क १५ हजारांवरून सात हजार रुपये करण्यात आले. आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या पॅ रामोटरिंगसाठी १५ हजार रुपये शुल्काला पर्यटन संचालनालयाने मान्यता दिली आहे.

जलपर्यटनासाठी धोरण बनविले जाणारजलपर्यटनाचा समुद्र क्षेत्रातील कालावधी हा १ सप्टेंबर ते १० जूनपर्यंत, तर जलपर्यटनासाठी तलाव, धरणक्षेत्र, नदी या क्षेत्रात बारमाही परवानगी असावी. जलपर्यटन व्यावसायिकांना समुद्र, खाडी, धरण, तलाव क्षेत्रात व्यवसायाची परवानगी घेताना राज्याच्या साहसी क्रीडा धोरणाप्रमाणे कार्यवाही व्हावी. यासाठी संबंधित विभाग व पर्यटन संचालनालय यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. जलपर्यटनातील प्रशिक्षणात एनआयडब्ल्यूएस, वायए, इसदा संस्थेचा समावेश होणार, जलपर्यटन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नौकांसाठी सर्व्हे व सर्व्हे प्रमाणपत्र मुदतीत मिळण्यासाठी धोरण बनविले जाणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन