शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांची ईडी चौकशी ही राजकीय हतबलता असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 16:55 IST

राज्य सहकारी बँकेचे संचालक नसतानासुद्धा लोकनेते शरद पवार यांच्यावर राज्य व केंद्र सरकारने ईडीमार्फत गुन्हा दाखल करून आपली राजकीय हतबलता दाखवून दिली.

ठळक मुद्देपवारांची ईडी चौकशी ही राजकीय हतबलता असल्याचा आरोपसरकारकडून सुडाचे राजकारण होतेय :  एम. के. गावडे

वेंगुर्ला : राज्य सहकारी बँकेचे संचालक नसतानासुद्धा लोकनेते शरद पवार यांच्यावर राज्य व केंद्र सरकारने ईडीमार्फत गुन्हा दाखल करून आपली राजकीय हतबलता दाखवून दिली.या बदनाम करण्याच्या षड्यंत्राचा राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध करतो. तसेच महाराष्ट्रातील सुज्ञ जनता या सुडाच्या राजकारणाचा बदला येत्या विधानसभा निवडणुकीत घेऊन युती सरकारला जागा दाखवून देईल, असे मत प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी मांडले.सहकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे शरद पवार यांना राज्यातील जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून, पवार यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र युती शासन करीत आहे. कितीही अपप्रचार केला तरी २०१४ ची पुनरावृत्ती होणार नाही.२०१९ चे निर्णय हे विचार करायला लावतील. पाच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यामुळे त्यांना यात्रा काढाव्या लागतात. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ३७० किंवा सर्जिकल स्ट्राईकचा आधार घ्यावा लागतो. मात्र, पुलवामा हल्ल्यात ४० निरपराध सैनिकांचा बळी गेला त्याबाबत बोलत नाहीत.

संरक्षणासारख्या गंभीर प्रश्नांवर महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागणे चुकीचे आहे. सुज्ञ जनता भाजपच्या या सुडाच्या राजकारणाचा बदला येत्या विधानसभा निवडणुकीत घेऊन युती सरकारला जागा दाखवेल, असे गावडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयsindhudurgसिंधुदुर्ग