शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पाटीलने सांगितले वस्तू ताब्यात घ्या, अन् खंडागळे अडकला; सावंतवाडी पोलीस लाचप्रकरणी धक्कादायक खुलासे बाहेर 

By अनंत खं.जाधव | Updated: October 14, 2023 17:49 IST

घटनेच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हा मंत्री दीपक केसरकर यांच्या सुरक्षा दौऱ्यात

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यात घडलेल्या लाच प्रकरणातील धक्कादायक खुलासे आता बाहेर येऊ लागले आहेत. घटना घडली त्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे हे पोलीस ठाण्यात होते. त्यांना पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील याने फोन करून वस्तू ताब्यात घ्या असे सांगितले. त्यामुळेच खंडागळे याने पैसे घेत ते गोणपाटात लपवून ठेवले होते. ते नंतर लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.सावंतवाडी पोलिस ठाण्यात तीन दिवसापूर्वी लाचलुचपत विभागाकडून धाड टाकून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला एक लाखाची लाच घेतना रंगेहाथ पकडले होते. मात्र ही लाच स्वीकारण्यापूर्वी या प्रकरणातील धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. तक्रारदार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांने उच्च न्यायालयात जात या प्रकरणात जामिन घेतला होता. मात्र त्यानंतर ही पोलिसांकडून ससेमिरा थांबत नव्हता. या काळात तक्रारदार आणि पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील याच्यात सतत बैठका होत होत्या. या बैठका एका हॉटेलात होत असत या बैठकीत पाटील हा तक्रारदाराला तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला गुन्ह्यातून बाहेर काढतो असे सांगत होता. तर त्याची शेवटची बैठक बुधवारी रात्री माजगाव येथे कारमध्ये झाली होती. ही बैठक होण्यामागे तक्रारदार याला विश्वास पटावा म्हणून खुद्द पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यानेच त्याला फोन करून बोलावून घेत तपास अधिकाऱ्यांसमोर बसवले. या तिघामध्ये चर्चा झाल्यानंतर तक्रारदारास विश्वास पटला आणि त्याने आपण ठरल्याप्रमाणे पैसे आणून देतो असे सांगून तक्रारदार तेथून निघून गेला.त्यानंतर घटनेच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हा मंत्री दीपक केसरकर यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत होता. याची कल्पना तक्रारदारास नव्हती त्याने पाटील याला फोन केला आपण सांगितल्या प्रमाणे पैसे आणले आहेत असे सांगितले कोणाकडे द्याचे विचारल्यावर मी बाहेर आहे साहेबांकडे द्या असे सांगितले. पाटील याने खंडागळे याला फोन करून सांगितले. वस्तू घेऊन आला आहे ती ताब्यात घ्या त्याप्रमाणे तक्रारदार कडून खंडागळे याने पैसे ताब्यात घेतले आणि तेथेच लाचलुचपतचे काम सोपे झाले.पैसे गोणपाटात दडवलेतक्रारदार याने एवढी मोठी रक्कम दिली ती कुठे ठेवायची म्हणत खंडागळे याने ते पैसे गोणपाटात दडवून ठेवले त्याचवेळी लाचलुचपत ने त्याच्यावर धाड टाकली बराच उशिर पैसे सापडत नव्हते म्हणून लाचलुचपत ने खंडागळे याच्या हाताला पावडर लागली का याची तपासणी केली असता पावडर लागली आहे.म्हणून आजूबाजूला तपासणी केली तेव्हा गोणपाटात पैसे सापडले.आणि सर्व गुढ उलगडले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण