शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नांदगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रुग्णांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:12 IST

नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले तीन महिने कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना परत जावे लागत आहे. यामुळे दूरवरून येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

ठळक मुद्दे कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रुग्णांना त्रासनांदगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती

तळेरे : नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले तीन महिने कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांना परत जावे लागत आहे. यामुळे दूरवरून येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत नांदगाव ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धडक दिल्यानंतर रुग्ण समितीची बैठक झाली. मात्र, वरिष्ठांची भेट घेण्यासाठी ओरोस येथे जाण्याबाबत ग्रामस्थ तयार नसून  नांदगांव आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी दोन डॉक्टरांची आवश्यकता आहे. तरीदेखील किमान एक कायमस्वरुपी डॉक्टर दिल्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तेथून हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाहीत. या आरोग्यकेंद्रात नांदगाव परिसरातील अनेक ठिकाणांहून रात्री-अपरात्री रुग्ण येत असतात. मागील आठवड्यात माईण येथील सर्पदंश झालेल्या रुग्णाला डॉक्टर नसल्याने इतरत्र हलविण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नांदगांव आरोग्य केंद्रात धडक दिली होती. त्यानंतर रुग्ण समिती यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत सोमवारी ओरोस येथे वरिष्ठांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु नांदगांव ग्रामस्थांना हे मान्य नसल्याने त्यांनी मंगळवारी नांदगांव आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविले. जोपर्यंत या केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर दिल्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.लाखो रुपये खर्च करून नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. अशा आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसेल तर त्या इमारतीचा उपयोग काय? नांदगाव आरोग्य केंद्राची इमारत महामार्गालगत आहे.

सध्या या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे तसेच महामार्गावर सध्या प्रचंड वाहतूक असल्यामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात. अशावेळी रात्री-अपरात्री डॉक्टर नसल्याने गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रामध्ये नांदगांव परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात येणार असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग