शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

तिघांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले; मडुरा स्थानकातून प्रवाशांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 17:36 IST

रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो.

ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसमधून करीत होते प्रवास :

बांदा : दिल्लीकडून मडगावकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून मडुरा रेल्वे स्थानकानजीक कर्नाटकचे २५ हून अधिक प्रवासी उतरून जंगलात पसार झाले. त्यापैकी ३ प्रवाशांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले. राजधानी एक्स्प्रेस क्रॉसिंगसाठी मडुरा स्थानकानजीक थांबली असता २५ हून अधिक प्रवाशांनी जंगलात पळ काढला. बांदा पोलिसांनी रितसर पास असल्याने त्या तीन प्रवाशांना गोव्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो. मडगाव रेल्वे स्थानकावर क्वारंटाईन होण्याच्या भीतीने आपण मडु-यात उतरल्याचे तिघांनी सांगितले.

घटनास्थळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, प्रकाश गावडे, यशवंत कुबल, सुदीन गावडे, पोलीस पाटील निर्जरा परब उपस्थित होते. याबाबत माहिती मिळताच तेथे बांदा पोलीस दाखल झाले. बांदा पोलिसांनी त्या परप्रांतीय कामगारांची चौकशी केली.

मडुरा रेल्वे स्थानकाला मडगांव स्थानक समजून कर्नाटकचे ते प्रवासी उतरले. काही क्षणांत रेल्वे मार्गस्थ झाली. त्यानंतर त्या प्रवाशांना आपण चुकीच्या रेल्वे स्थानकांत उतरलो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी जंगलातून गोव्याच्या दिशेने पलायन केले.

कर्नाटकमधून नेण्यासाठी येणारदिल्लीकडून मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस क्रॉसिंगसाठी मडुरा स्थानकानजीक थांबली. त्यातील तिघांना स्थानिकांनी पकडले. त्यांच्याकडे रितसर पास असल्याने त्या तिघांना गोव्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आले. इतरही प्रवाशांनी आपल्याकडे पास असल्याचे सांगितले. त्या प्रवाशांना कर्नाटक सरकारकडून नेण्यात येणार आहे, अशी माहिती बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली.स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे