शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बॉक्सवेलचा काही भाग धोकादायक, कणकवलीतील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:46 IST

कणकवली शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन फुटांपेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहामार्ग बॉक्सवेलचा काही भाग धोकादायक, कणकवलीतील स्थितीकोसळण्याच्या स्थितीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट

कणकवली : शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन फुटांपेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या बाजूने होणारी वाहतूक तातडीने बंद करून ती एकाच बाजूने वळविण्याची सूचना तहसीलदार आर. जे. पवार यांनी पोलिसांना केली. त्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात आली.पहिल्याच पावसात बॉक्सवेलची झालेली ही दुरवस्था लक्षात घेता दिलीप बिल्डकॉनच्या महामार्ग कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कणकवली शहरात दिलीप बिल्डकॉन गेली चार वर्षे महामार्गाचे काम करीत आहे. त्यात अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार स्पष्ट दिसून आला आहे.

यापूर्वी अशा कारभारामुळे नागरिकांकडून उग्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तरीही निकृष्ट कामाची पुन्हा पुन्हा प्रचिती येत आहे. शहरातील गांगो मंदिर आणि एस. एम. हायस्कूल ही नेहमीच रहदारीची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणीच उभारण्यात आलेली भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.शनिवारी सकाळी काही जागरूक नागरिकांनी तहसीलदार आर. जे. पवार यांना संबंधित स्थितीची माहिती दिली. त्यांनी तत्काळ पाहणी करून त्या बाजूची वाहतूक पोलिसांना बंद करायला लावली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता गणेश महाजन यांना भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली. तसेच दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनाही त्याबाबत कळविले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग