शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांची परिक्रमा खंडपीठे दोन दिवस व्हावीत, विश्व हिंदू परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 15:46 IST

खटल्यांसाठी मुंबई येथे जाणे पक्षकारांना भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे

मालवण :  कोकण विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण ही दोन्ही न्यायालयेमुंबई येथे असल्याकारणाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पक्षकारांना तेथे खटल्यांसाठी जाणे भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे ठरते. बहुतांश वेळा या ठिकाणी पक्षकारांना तारखांवर तारखा दिल्या जातात. यामुळे होणारा सर्वच भुर्दंड लक्षात घेता दोन्ही न्यायालये महिन्यातून दोन दिवस रत्नागिरी आणि दोन दिवस सिंधुदुर्ग येथे सुरू केल्यास रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे. हा प्रश्न वि. हिं. प.च्या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी मांडली असून, गावागावांतील ग्रामसभांमध्ये याबाबत ठराव घेण्यात यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेमार्फत करण्यात आले आहे.कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी महसुली खटले चालविण्याकरिता वरिष्ठ स्तरावर विभागीय आयुक्त कोकण विभाग आणि महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई ही न्यायालये आहेत. मात्र, ही दोन्ही न्यायालये कायमस्वरूपी मुंबई येथे आहेत. रायगड, ठाणे पालघर आणि मुंबई या चार जिल्ह्यांसाठी मुंबईचे अंतर भौगोलिकदृष्ट्या कमी, आर्थिकदृष्ट्या सोयीचे आहे. परंतु, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेदेखील या न्यायालयांच्या अधिकार कक्षेत येतात.मात्र, भौगोलिकदृष्ट्या या जिल्ह्यांचे मुंबईपासूनचे अंतर बरेच मोठे आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथून मुंबईला जाऊन वरिष्ठ न्यायालयातील अपील, रिव्हिजन, अथवा तत्सम काम चालविणे वकील तसेच पक्षकारांना आर्थिकदृष्ट्या फारच खर्चिक होत आहे. खटल्यासाठी मुंबई येथे जाणे, येण्यासाठी प्रचंड वेळ खर्ची पडत आहे.यामुळे विभागीय आयुक्त आणि महसूल न्यायाधिकरण यांची परिक्रमा खंडपीठ महिन्यातून दोन दिवस रत्नागिरी, दोन दिवस सिंधुदुर्ग येथे सुरू केल्यास येथील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासाठी प्रशस्त जागादेखील उपलब्ध आहे. मात्र, शासनाने याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदन विश्व हिंदू परिषदेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही जिल्ह्यांत गावागावांत याबाबत ठराव घेण्यात यावा, असे आवाहनदेखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालयMumbaiमुंबई