शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल : दीक्षित गेडाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:07 IST

जिल्हाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कोरोना कालावधीत सतर्कता राखणे अधिक शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल उभारण्याचे राज्यभरात आदर्शवत असे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुलसिंधुदुर्गात आदर्शवत काम : दीक्षित गेडाम

ओरोस : जिल्हाभरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कोरोना कालावधीत सतर्कता राखणे अधिक शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वत:चे निवासी संकुल उभारण्याचे राज्यभरात आदर्शवत असे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची मुख्यालयातील पत्रकारांनी भेट घेतली असता ते बोलत होते. गेडाम म्हणाले, राज्यात आणि देशात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याने मात्र जागरुकता तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून समतोल राखला.

पोलीस, पत्रकार, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन त्यांच्या सांघिक कामातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा अटकाव करण्यात यश आले आहे. जनतेनेही आपल्या मनात आदरयुक्त भीती ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. काहीवेळा नाहक फिरणाऱ्या वाहनचालकांना वाहन जप्त करणे, दंडात्मक कारवाई करणे, प्रशासनाला भाग पडले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले नाही.गेल्या वर्षा-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्ही कॅमऱ्याने जोडल्यामुळे वाढत्या चोऱ्यासह कोरोना संक्रमण कालावधीत नाहक फिरणाऱ्या दुचाकी चालकांना अटकाव करणे शक्य झाले. या आदर्शवत कामाची पोचपावती राज्यभरात मिळाली आहे. पोलिसांच्या निवासी संकुलाचा प्रश्नही मार्गी लागला. सिंधुदुर्गनगरीत उभालेल्या या पोलीस निवासी संकुलामुळे राज्यभरात एक आदर्शवत काम उभे झाले आहे. हेच उदाहरण व याचा आदर्श अन्य जिल्ह्यातून घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.जनतेचे सहकार्यकोरोना काळात सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कोरोनावर मात केली. संस्थात्मक क्वारंटाईन व होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनीही चांगले सहकार्य केले. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक जनतेची कोरोना बाधित संख्या एक ते दोन टक्केच दिसून आली. हे सिंधुदुर्गवासीयांचे यश आहे. यापुढेही कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे आवाहनही गेडाम यांनी जनतेला केले. 

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग