शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ओटवणेतील युवकाचा मुंबईत अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 11:31 IST

मुंबई-अंधेरी येथे दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ओटवणे येथील योगेश गावकर हा युवक ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, अपघाताच्या वृत्ताने ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे. योगेशचा मृतदेह ओटवणे येथे आणण्यात आला.

ठळक मुद्देओटवणेतील युवकाचा मुंबईत अपघातात मृत्यूअपघाताच्या वृत्ताने ओटवणे गावावर शोककळा

सावंतवाडी : मुंबई-अंधेरी येथे दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ओटवणे येथील योगेश गावकर हा युवक ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, अपघाताच्या वृत्ताने ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे. योगेशचा मृतदेह ओटवणे येथे आणण्यात आला.योगेश हा कामानिमित्त मुंबई येथे होता. तो ठाणे येथील एका ग्लोबल कंपनीत काम करीत असे. शनिवारी रात्री दहा वाजता कामावरून मित्रांसमवेत दुचाकीवरून तो राहत असलेल्या खोलीवर परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेशला गंभीर दुखापत झाली होती. तो रस्त्याच्या बाजूला फेकला गेला होता. अपघातानंतर ट्रक चालकाने तेथून पलायन केले.त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ रिक्षाने ठाण्यातील खासगी रुग्णालयात हलविले. पण गंभीर दुखापत झाली असल्याने त्याचे वाटेतच निधन झाले. या घटनेची माहिती ओटवणे गावी रात्री उशिरा देण्यात आली.

अपघातानंतर अंधेरी येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी योगेशचा मृतदेह ओटवणे येथे आणण्यात आला. योगेशच्या निधनाने ओटवणे गावावर शोककळा पसरली असून, अनेकांनी हळहळ व्यक्त केली.योगेश हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे शालेय शिक्षण ओटवणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथे झाले होते. ओटवणे पंचक्रोशीत त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. अलीकडेच तो मुंबईत येथे कामाला गेला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग