शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा भविष्यकाळ अडचणीचा, आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

By सुधीर राणे | Updated: November 29, 2023 19:13 IST

संविधान बचाव यात्रेचे कणकवलीत स्वागत 

कणकवली : संविधान बचाव ही बहुजनांची गरज आहे. अन्यथा भविष्य काळ सर्वांसाठी अडचणीचा असेल. भारतीय संविधानाची पायमल्ली करुन देश हुकुमशाहीकडे जात आहे. अन्याय अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे बहुजनांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, रिपब्लिक सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे त्यांची संविधान बचाव यात्रेनिमित्त कॉर्नर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.रिपब्लिकन सेनेची ही संविधान बचाव यात्रा आज कणकवलीत आली. दिक्षाभूमी नागपूर येथून संविधान बचाव यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरून ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी या ठिकाणी पोहचेल. कणकवली येथील बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आनंदराज आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी आनंदराज आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, सिंपण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस प्रकाश करुळकर, दत्ता पवार, धनाजी जाधव, बी .एस. कदम, सुशील कदम, तानाजी कांबळे, संदीप कदम आदी उपस्थित होते.यावेळी अनिल तांबे म्हणाले, संविधान बचाव यात्रा घेऊन बहुजनांचा लढा आनंदराज आंबेडकर लढत आहेत. राज्यभर संविधान बचाव यात्रा सुरू आहे. या यात्रेतून संविधान बचाव करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. कणकवलीतही आनंदराज आंबेडकर यांचे सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली