शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांना त्रास पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंटची जंगले, राजन तेली आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:42 IST

सावंतवाडी: आंबोली येथे सामान्य माणसाला वन विभागाकडून त्रास दिला जातो, पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंट काँक्रीटचे जंगल कशी काय ...

सावंतवाडी: आंबोली येथे सामान्य माणसाला वन विभागाकडून त्रास दिला जातो, पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंट काँक्रीटचे जंगल कशी काय उभी राहतात हे कळत नाही. वन विभागाने सिमेंट काँक्रीटची जंगले तत्काळ थांबवावीत अन्यथा त्यांच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. याची जबाबदारी सर्वस्वी वनविभागाची असेल असेही ते म्हणाले. तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी अद्याप पर्यंत संभाव्य यादी तयार झाली नसल्याचे हे त्यांनी सांगितले.पंचायत समितीमध्ये आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक तथा पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर उपस्थित होते.तेली पुढे म्हणाले, पाच राज्याचा निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हा चमत्कार दिसून येणार आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता स्थानिक आमदार दीपक केसरकर अजूनही कोट्यवधीच्या वल्गना करत आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झाली नसून ते केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहे. चांदा ते बांदा योजनेचे पैसे परत गेल्याचे सांगून एक प्रकारे आपण कितपत अकार्यक्षम पालकमंत्री होतो हे स्वतःच्या तोंडातून ते सांगत आहेत.  येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची कुठलीही संभाव्य यादी तयार करण्यात आलेले नाही. सर्वांना सोबत घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.केसरकर श्रेय लाटत आहेतआंबोली चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न हा फडणवीस सरकार काळातच मिटला आहे. केवळ औपचारिकताच बाकी आहे. मात्र केवळ श्रेय मिळावे म्हणून आमदार दिपक केसरकर हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीचे कारण पुढे करत आहेत अशी टीकाही राजन तेली यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली