शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:03 IST

कुडाळ : ठेकेदारांनी योग्य वेळेत चांगले व त्यांच्या कामाची यशोगाथा वर्षानवर्षे टिकून राहील, असे काम केल्यास विकासकामांना दिलेला निधी ...

ठळक मुद्देभात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाणवर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या तेंडोली-भोम पुलाचे उद्घाटन

कुडाळ : ठेकेदारांनी योग्य वेळेत चांगले व त्यांच्या कामाची यशोगाथा वर्षानवर्षे टिकून राहील, असे काम केल्यास विकासकामांना दिलेला निधी कधीच वाया जाणार नाही, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तेंडोली-भोम पुलाच्या शुभारंभी प्रसंगी केले. शेतकऱ्यांच्या भात पिकाची खरेदी योग्य वेळेत होण्यासाठी या संदर्भातील अध्यादेश शासनाकडून आॅगस्ट महिन्यातच काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कुडाळ तालुक्यातील गेले अनेक वर्षे मागणी असलेल्या तेंडोली-भोम पुलाचा शुभारंभ राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, पंचायत समिती सदस्या अनघा तेंडोलकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका जाधव, भाजपाचे भाई सावंत, महेश सारंग, राजू राऊळ, नीलेश तेंडुलकर, अतुल बंगे, विजय प्रभू, संजय वेंगुर्लेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.तेंडोलीचा पाणी प्रश्न सोडविणार : वैभव नाईकयुती सरकारच्याच काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झाली आहेत. राज्याचे बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले रस्ते, पूल व साकवांच्या कामांना गती मिळाली असून, लवकरच ही कामे पूर्ण होतील, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. तेंडोली येथील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. येथील शेती व बागायतींना योग्य प्रकारे पाणीपुरवठा होण्याकरिता विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.भात पिकाबाबत जनजागृती कराआॅगस्टमध्येच भातपीक खरेदीचा शासन निर्णय निघेल. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी भातपीक खरेदी केंद्र्रावर नेण्याकरिता तसेच भात पिकाला सरकारकडून मिळणाऱ्या चांगल्या दराबाबत व जास्तीत जास्त भात पीक पिकविण्याबाबत सर्वांनी गावोगावी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग