सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे सिंधुदुर्गचा विकास ठप्प असे माझे स्पष्ट मत आहे. जैवविविधतेचे काय नुकसान होते यासाठी माझ्यासोबत चर्चेला बसा. हा रस्ता गेल्यामुळे समृद्धी येणार आहे. अन्यथा आमच्या लोकांनी भुकेने मरायचे का? इथे उद्योग, विकास व्हायला नको का, असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी केला.ग्रीन कव्हर आमच्या लोकांनी राखले आहे. आता बोलणारे कोणी तेव्हा आले नाहीत. आमच्या लोकांनी जंगल राखलीत. त्यावर अधिकारही त्यांचाच आहे. महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय. माझा ठाम पाठिंबा त्याला आहे, असेही ते म्हणाले.केसरकर पुढे म्हणाले, आमचा विकास थांबवणे ही कोणती नीती आहे? आमची लोक एक झाड तोडले तर चार झाड लावतात. आमचा विकास थांबवून फक्त श्रेय न घेता ग्रीन कव्हर नाही तिथे झाड लावा. नागपूरचा टायगर बघितल्यावर इथला ब्लॅक पँथर बघायला पर्यटक आले पाहिजे. इथला समुद्र बघायला लोक आले पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय. माझा ठाम पाठिंबा त्याला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग समृद्धी महामार्ग वाढवणे बंदराला जोडला तसाच हा शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा ही माझी मागणी आहे.निसर्ग पर्यटन रक्षणाची जबाबदारी आमचीयेथून नागपूरची संत्री, आमचा माल परदेशात जाऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच आमच्या लोकांनी ही झाडं लावलेली आहेत. त्यामुळे ती झाडं आमच्या लोकांची आहेत. आमच्या लोकांचं भले करून निसर्ग पर्यटन रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही ती पूर्ण करू, आजपर्यंत आम्ही ते केले आहे, असे विधान केसरकर यांनी केले.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकास ठप्प - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:33 IST