शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विरोधकांच्या आरोपांना ३० डिसेंबर नंतर उत्तर देणार!, आमदार नितेश राणेंचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 18:00 IST

जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची केली घोषणा.

कणकवली : आम्हाला आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आचारसंहिता घालून दिली आहे. त्यामुळे विरोधकांच्या राजकीय आरोपांची उत्तरे ३० डिसेंबरनंतर त्याच ताकदीने दिली जातील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला. यावेळी त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. कणकवली येथे आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी नितेश राणे म्हणाले, जिल्हा बँकेत परिवर्तन होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला होईल. देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत, त्याचा फायदा बँकेला व नागरिकांना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्हा बँकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन आम्हीच परमनंट करू शकतो.सहकार क्षेत्रातील ही निवडणूक आहे, कठलेही राजकारण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत नाही. सहकार रुजला पाहिजे, त्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. कुणीही कितीही टीका टिप्पणी केली तरी आम्ही बोलणार नाही. सिद्धिविनायक सहकार पॅनेलचे प्रमुख राजन तेली असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.राजन तेली म्हणाले, जिल्हा बँकेची प्रगती झाली, विकासाची कामे, व्यवहार वाढला हे यश राणेंमुळे मिळाले आहे. त्यामुळे १९ ही जागा आम्ही जिंकणार आहोत. आता ९८१ मतदार आहेत, घाणेरडे राजकारण सतीश सावंत यांनी केले, खात्यात पैसे असतानाही संबधित संस्था बाद केल्या आहेत,अशीही टीका त्यांनी केली. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख राजन तेली, बँक उमेदवार अतुल काळसेकर, महेश सारंग, मनीष दळवी, प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण, गुरुनाथ पेडणेकर, आदी भाजपा पुरस्कृत जिल्हा बँक उमेदवार उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे bankबँकElectionनिवडणूक