शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

सिंधुदुर्ग : वैभववाडी बाजारपेठेत वाढणाऱ्या टपऱ्यांवरुन विरोधक आक्रमक, नगराध्यक्षांना विचारला जाब; शाब्दिक खटके; कारवाईचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:16 IST

वैभववाडी बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.

ठळक मुद्देवाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे वैभववाडी बाजारपेठेला बकालपणा नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब पथदिव्यांचे काम अर्धवट का?, तुमच्यामुळे आमची बदनामी होतेय नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये उडाले जोरदार शाब्दिक खटके

वैभववाडी : बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.वैभववाडी बाजारपेठेतील दत्तमंदिर परिसर आणि दुर्गामाता उत्सव साजरा होणाऱ्या शासकीय भूखंडावर गेल्या तीन महिन्यांत टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाढणारी टपऱ्यांची संख्या हा शहरातील चर्चेचा विषय बनला. 

सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, भाजपचे शहराध्यक्ष रणजित तावडे, नगरसेवक संतोष माईणकर, रत्नाकर कदम यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. यावेळी शिवाजी राणे, अमित भागवत, बारक्या निकम, अजय मोहिते उपस्थित होते.समोरच टपऱ्यांची संख्या वाढत असताना नगरपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक भूखंडावरुन उचलून नगरपंचायतीच्या आवारात आणलेला स्टॉल दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी लागतो कसा? अशी विचारणा तावडे, रावराणे व पवार यांनी केली.

अशा पद्धतीने सार्वजनिक जागा टपऱ्यांनी अडविल्या जाणार असतील तर भविष्यात बाजारपेठेचे चित्र कसे असेल असा प्रश्नही नगराध्यक्षांना केला. त्यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.तुमची तक्रार असेल तर लेखी द्या; बाजारपेठेतील सगळ्याच टपऱ्या काढून टाकू, असे नगराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी ग्रामपंचायत काळातील टपऱ्या न हटवता त्यांचे योग्य पुनर्वसन करा; मात्र नव्याने लागलेल्या टपऱ्या काही लोक भाड्याने चालवत आहेत. त्यामुळे दत्तमंदिर परिसर आणि शासकीय भूखंडातील टपऱ्या तातडीने काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली.

त्यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी प्रभारी मुख्याधिकारी देवानंद डेकळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लवकरच नगरपंचायतीची विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पथदिव्यांचे काम अर्धवट का?वैभववाडी शहरातील तावडेवाडी येथील पथदिव्यांचे काम मी रोखले अशी सर्वत्र बोंब मारली गेली. परंतु, ते कोणी आणि का थांबविले? याची तुम्ही चौकशी केलीत का? अशी विचारणा नगराध्यक्षांना करीत पथदिव्यांचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप रणजित तावडे यांनी केला.

तावडेवाडीतील पथदिव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानासुद्धा ठेकेदाराला नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिला याचा अर्थ जनतेने काय काढायचा? असा प्रश्नही तावडे यांनी नगराध्यक्ष चव्हाण यांना विचारला.तुमच्यामुळे आमची बदनामी होतेयबाजारपेठेत टपऱ्या लागतात. त्या टपऱ्यावर कारवाई न करण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक हजारो रुपये घेतात, अशी शहरात बोंब ऐकायला मिळते, असा आरोप करीत टपऱ्यांबाबतच्या तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आमची जनतेत नाहक बदनामी होत आहे. आम्ही ती का सहन करायची? असा रोखठोक सवाल नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे व संतोष माईणकर यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका