शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
5
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
6
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
7
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
8
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
9
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
10
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
11
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
12
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
13
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
14
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
15
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
17
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
18
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
19
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
20
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत मोती तलावातील 'ऑपरेशन मगर' अद्याप अपयशी, वन विभागाकडून पुन्हा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:10 IST

सापळा लावला तरी मगरीचे दर्शन 

सावंतवाडी : मोती तलावातील पहिले ऑपरेशन मगर फेल ठरल्यानंतर आता वन विभागाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन मगर सुरू केले आहे. मात्र, याला किती यश येईल ते पाहावे लागणार आहे. कारण, मगरीने आपले वास्तव्य कारंज्यावर बसवले असून, वन विभागाद्वारे लावलेल्या सापळ्याला ती हुलकावणी देत आहे. त्यामुळे वन विभागाचे जलद कृती दल कामाला लागले आहे.मोती तलावात असलेल्या या मगरीला पकडण्यासाठी शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. सोमवारपासून मगरीचा माग वन विभागाची टीम काढत असून, मगरीला जरा संशय आला की, ती पाण्यात पळ काढते. त्यामुळे कालचे रेस्क्यू ऑपरेशन अपयशी ठरले. आता पुन्हा एकदा ही टीम मगरीला पकडण्याचा प्रयत्न करणार असून, गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि काळजी घ्यावी, असे आवाहन रेस्क्यू टीमकडून बबन रेडकर यांनी केले आहे.

जेरबंद करण्यात अपयशउप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दलाने ही मोहीम राबवली आहे. यापूर्वी नागरिकांनी रोष व्यक्त करत संतापही नोंदवला होता, ज्यामुळे उप वनसंरक्षक यांचे लक्ष वेधले गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत जलद कृती दलाचे सदस्य बबन रेडकर, तुषार सावंत, शुभम सावंत आणि सिद्धेश नेमळेकर (सावंत) तलावात उतरून मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मगरीने पाण्यात पळ काढल्यामुळे तिला जेरबंद करण्यात अपयश आले.

नागरिकांनी पाण्यात उतरू नयेबबन रेडकर म्हणाले, नैसर्गिक अधिवासात मगरी आहे आणि त्या परिसरात पाणीही भरलेले आहे. पिंजरा लावूनही ती त्यात येत नाही. माणसाची चाहूल लागताच मगर पळून जाते. आताही काही अंतरावर असताना तिने पळ काढला. माणसाला धोका नाही, मात्र नागरिकांनी पाण्यात उतरू नये व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कारंज्याच्या परिसरात वास्तव्यगेल्या काही दिवसांपासून मगरी कारंज्याच्या परिसरात वास्तव्य करत आहे. ती मध्येच पाण्याच्या बाहेर येते आणि मनुष्याची चाहूल लागल्यास पाण्यात परत जाते. त्यामुळे आता ऑपरेशन मगर वनविभागाचे किती यशस्वी ठरते ते पाहावे लागणार आहे.