शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चातून दिलेल्या गस्तीनौकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:21 IST

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडे आवश्यक गस्तीनौका नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चातून गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या गस्तीनौकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सत्ताधाऱ्यांनी व मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी कारणे पुढे न करता प्रत्यक्षात कारवाई करावी, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपरप्रांतिय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी मत्स्यखात्याकडे नव्हती आवश्यक गस्ती नौका

मालवण : जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी आणि एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याकडे आवश्यक गस्तीनौका नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चातून गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या गस्तीनौकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सत्ताधाऱ्यांनी व मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी कारणे पुढे न करता प्रत्यक्षात कारवाई करावी, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व एलईडीच्या घुसखोरीमुळे मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेला जात आहे. मत्स्य व्यवसाय खाते मच्छिमारांचे संरक्षण करण्यास कमी पडत आहे. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. शिवाय गेली पाच वर्षे सत्ताधारी गस्तीनौका उपलब्ध करून देणार असे सांगत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही. पोलिसांची गस्तीनौका वापरली जाते मात्र त्यावरून परप्रांतीयांची घुसखोरी थांबविण्यात अपयश येत आहे.परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांकडून मासळीची लूट केली जात आहे. त्यामुळे मत्स्यदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठीच गस्तीनौका उपलब्ध करून देण्याचा शब्द मी दिला. त्यानुसार त्याची कार्यवाही झाली आहे. या गस्तीनौकेबाबत मत्स्य व्यवसाय खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे.येत्या काही दिवसात येथील कार्यालयास त्याबाबतचे पत्र प्राप्त होईल. आम्ही आमची जबाबदारी पार पाडत मत्स्य व्यवसाय खात्याला आधार, ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता त्यांनी कारणे पुढे करू नयेत. यापुढे कारणे दिल्यास त्याला मत्स्य व्यवसाय खाते, अधिकारी जबाबदार असतील. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी पाऊल उचलू असा इशारा राणे यांनी दिला.यावेळी स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दीपक पाटकर, छोटू सावजी, दाजी सावजी, दामोदर तोडणकर, अभय कदम, आबा हडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग