शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

नवा निर्णय : केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा

सागर पाटील - टेंभ्ये -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुनर्परीक्षेचा कोकण विभागातील मार्च २०१५ परीक्षेत अनुत्तीर्ण १४०० तसेच ३५२ रिपीटर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसल्याचे कोकण विभागीय शिक्षण मंडळातून सांगण्यात आले.मार्च २०१५मध्ये कोकण विभागातून दहावीच्या परीक्षेला ३९,७८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३८,४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात १२२४, विज्ञानमध्ये १२२३, इंग्रजी (२/३) मध्ये ७७९, सामान्य गणितमध्ये ७३०, मराठी (प्रथम) मध्ये ७२५, हिंदीमध्ये ६८७, तर समाजशास्त्र विषयात ६२४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे २१ जुलैपासून या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पुरवणी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. १५ जूनपासून आॅनलाईन आवेदनपत्र सादर करता येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वीच्या शाळेतून आवेदनपत्र भरता येणार आहेत. नियमीत शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख २३ जून आहे. २६ जूनपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत.या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात परीक्षा केेंद्र निर्माण करण्यात येणार आहेत.मार्च २०१५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील या परीक्षेचा फायदा होणार आहे. यावर्षी केवळ दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा मात्र पूर्वीप्रमाणेच आॅक्टोबर २०१५ मध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अंमलबजावणीच्या यशापयशाचा विचार करुन मार्च २०१६ नंतर इयत्ता दहावी व बारावी या दोन्ही वर्गाची पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी दहावीची आॅक्टोबरची परीक्षा घेण्यात येणार नाही असे बोर्ड$िातर्पे सांगण्यात येत आहे. शासनाने पुरवणी परीक्षेचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याला नियमीत विद्यार्थ्यांप्रमाणे इयत्ता अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घ्यावा. प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत उपयुक्त आहे.- आर. बी. गिरी,अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ.