शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg: पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजनच्या सभेचा फक्त सोपस्कार - परशुराम उपरकर

By सुधीर राणे | Updated: July 11, 2023 15:28 IST

निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळत असताना पुन्हा नियुक्ती देण्याचा अजब निर्णय

कणकवली: जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी सहा महिन्यांनी झाली आहे.  आता सत्ताधारी असलेले आमदार विरोधी पक्षात होते, त्यावेळी सभा न झाल्यास बोंब मारायचे. मात्र, ते आता गप्प बसले आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला आहे. जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्ह्याच्या विकासासाठी असते. परंतु, केवळ आमदारांनी स्वतःचे प्रश्न सभेत मांडले. राज्याचे बांधकाम मंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हा 'खड्डे मुक्त नव्हे, तर खड्डे युक्त' झाल्याचे दिसून येत आहे असा आरोप मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.तसेच जिल्ह्यातील अनेक अधिकारी शुक्रवारीच आपल्या गावी  पळतात. मात्र, सत्ताधाऱ्यांचा त्यांच्यावर  वचक नाही. त्यामुळे जनतेची कामे रखडत आहेत असेही ते म्हणाले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जनतेने  लोकप्रतिनिधींना निवडून दिले परंतु, त्यांचे अधिकारी काहीही ऐकत नाहीत. ही व्यथा पालकमंत्र्यांसमोर अनेकांनी मांडली आहे. त्या आमदारांना विधिमंडळात प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठवण्याची संधी आहे. मग जिल्हा नियोजन समितीच्या सभेत हे आमदार चर्चा कशाला करत होते? असा प्रश्न पडतो. जिल्ह्यातील बरेच प्रथम श्रेणीतील अधिकारी दौरा रजिस्टर किंवा हालचाल रजिस्टर ठेवत नाहीत. अधिकारी बैठका असल्याचे सांगून शुक्रवारी कार्यालयातून पळतात. परंतु शासनाने यापूर्वीच जीआर काढला आहे की, खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे, कोल्हापुर, मुंबई येथे अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी न जाता व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे बैठका घ्याव्यात. हे पालकमंत्र्यांना माहीत नाही का? असा प्रश्न उपरकर यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्गातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. ते खड्डे  मुरुम माती, खडीने पुन्हा पुन्हा भरले जातात. पण पावसाच्या पाण्याने ती माती वाहून जाते. त्यामुळे खड्डे पावसाळी डांबराने बुजविण्याचे आदेश बांधकाम मंत्र्यांनी का दिले नाहीत? भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली खड्ड्यांबाबत बोलणार हे वृत्तपत्रात वाचले, पण ते काहीच बोलले नाहीत. शासन जिल्ह्याला निधी देत नाही हे ठेकेदारांनी पालकमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीतून कळले आहे. त्यामुळे हे शासन सर्व सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आहे की, श्रीमंतांना श्रीमंत करण्यासाठी आहे? अजब निर्णय शिक्षण मंत्री  दीपक केसरकर यांनी निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळत असताना पुन्हा नियुक्ती देण्याचा अजब निर्णय घेतला आहे. तर अनेक डीएड झालेल्या बेरोजगारांना त्यांचे वय जास्त झाल्याने नोकऱ्या मिळत नाही. त्यांना कोण न्याय देणार? असा सवालही परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Dipak Kesarkarदीपक केसरकर