शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

पालकमंत्र्यांकडून निधी आणल्याच्या केवळ घोषणाच, परशुराम उपरकरांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: July 1, 2023 15:56 IST

जिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष

कणकवली : राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळाले तरी विकासात फरक पडलेला नाही. राज्यातील सरकारला वर्ष झाले तरी सार्वजनिक बांधकामच्या कार्यपद्धतीत कोणताच फरक पडला नाही. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसून निधी आणल्याच्या ते केवळ घोषणाच करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, ज्या रस्त्यांना वर्षभरात किंवा वॉरटी कालावधीत खड्डे पडतात, त्याबाबत जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिनवणे मनसे खपवून घेणार नाही. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबतच्या माहितीसाठी थेट जनतेचा सहभाग असावा यासाठी तांत्रिक सल्लागारांच्या कार्यशाळा मनसेमार्फत घेणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.

सुपूत्रांचे दुर्लक्षजिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या बिलांसाठीचा निधीही हे मंत्री देऊ शकले नाहीत, हे ठेकेदारांच्या भेटीतून उघड झाले. मात्र, ठेकेदार व अधिकारी हे पैसे यावेत म्हणून गेले होते की 'कट' ठरविण्यासाठी गेले होते? असा सवाल करत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीकडे मनसे लक्ष ठेऊन आहे.

पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात. मात्र अवघ्या ८ दिवसात नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडू लागलेले आहेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १४ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून एकेरी वाहतूक करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिलेले  होते, त्याचे काय झाले? गणेशोत्सवापूर्वी पुन्हा चार दिवस खड्डेमुक्तीची घोषणा होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीParshuram Upkarपरशुराम उपरकर