शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

गोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:22 IST

सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देगोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा  महिन्यानंतरही अंमलबजावणी नसल्याने नाराजी

दोडामार्ग : सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.या आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांनाच खुद्द या कटू प्रसंगास सामोरे जावे लागले असून जोपर्यंत शुल्क भरणा करीत नाही, तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने तब्बल तीन तास रुग्णाला उपचारासाठी ताटकळत रहावे लागले. त्यामुळे जनआक्रोश आंदोलनासाठी बसलेल्यांची दिशाभूल होतेय की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.परराज्यातील रुग्णांवर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार नाहीत. त्यांना ठरवून दिलेली शुल्क आकारणी भरणा करावी लागेल, असा निर्णय दोन महिन्यांपूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतल्यावर त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गवासीयांना बसत होता. त्यामुळे बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन उभारण्यात आले. तब्बल दहा दिवस हे आंदोलन चालले.अखेर भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदींच्या पुढाकारातून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात बैठक झाली.

या बैठकीत सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक तसेच अती गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र, या निर्णयाला महिना उलटला तरी अद्यापही बांबोळीत शुल्क भरून घेतले जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

बुधवारी जनआक्रोश आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांना त्या कटू अनुभवास सामोरे जावे लागले. वरक यांचे वडील आजारी असल्याने त्यांना बांबोळीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जोपर्यंत उपचारासाठी आकारण्यात आलेली रक्कम भरणा केली जात नाही तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे तब्बल तीन तास वरक यांना उपचारासाठी ताटकळत रहावे लागले.

दोन्ही राज्याच्या मंत्र्यांनी मोफत उपचाराची घोषणा केली असताना सुद्धा बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांबाबत असा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे जनआक्रोश आंदोलना दरम्यान केलेल्या घोषणेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आंदोलकांची दिशाभूल तर झाली नाही ना असा संभ्रमही आता निर्माण झाला आहे.सोशल मीडियावरही तीव्र पडसाद उमटले आहे. जनआक्रोश आंदोलनानंतरही बांबोळीत दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबाबतही तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही राज्य सरकारच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जाबांबोळीत संदेश वरक यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यावेळी वरक यांनी जनआक्रोश आंदोलनाची आठवण करून देत आपण या आंदोलनाचे संयोजक असल्याचे सांगून रेशनकार्ड उद्या देतो उपचार सुरू करा, असे सांगितले. मात्र, प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकून न घेता पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जा, असे सांगितले.जन आक्रोशच्या संयोजकांची तातडीची बैठकबांबोळीत शुल्क आकारण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने जनआक्रोश आंदोलनाच्या संयोजकांची तातडीची बैठक शुक्रवारी (१८ मे रोजी) बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णयासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाhospitalहॉस्पिटल