शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना कांदा रडविणार : उपरकर, जनता कंटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 16:44 IST

केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा टोला मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे सत्ताधाऱ्यांना कांदा रडविणार : उपरकर, जनता कंटाळलीशिवसेना-भाजप विरोधात होणार नकारात्मक मतदान

मालवण : केंद्र व राज्यातील सरकार बँक घोटाळे करून पळून जाणाऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे बेकारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून सर्वसामान्य गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणत असलेला कांदाच सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत रडवेल, असा टोला मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, गुरू तोडणकर, विल्सन गिरकर, भारती वाघ, आबा आडकर, राजू गिरकर, बापू तोडणकर, सुनील हिंदळेकर आदी उपस्थित होते.भविष्यात शिवसेनेची सत्ता येईल आणि आपल्याला सर्व ठेके मिळतील, या आशेने स्वाभिमानच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, याच सत्ताधाऱ्यांची कार्यपद्धती पाहून मतदार राजा आता त्यांच्या पारड्यात मते टाकणार नाही, अशी टीकाही उपरकर यांनी केली.उपरकर म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत नारायण राणेंना कंटाळून नकारात्मक भावनेतून शिवसेनेला मतदान केले. मात्र, आमदार वैभव नाईकांच्या पाच वर्षांतील कार्यपद्धतीची नौटंकी मतदारसंघातील जनतेने पाहिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधी मतदान जनता करणार आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात मनसे ताकदीनिशी उतरणार आहे. सत्ताधाऱ्यांचे कारभार लोकांसमोर मांडणार आहे.रविवार २९ सप्टेंबर रोजी कुंभारमाठ येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :onionकांदाsindhudurgसिंधुदुर्ग