शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 25, 2024 11:51 IST

संदीप बोडवे मालवण : तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला आग लागून दीपक सखाराम परब (बावकर) (वय-५५) यांचा आगीत ...

संदीप बोडवेमालवण : तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला आग लागून दीपक सखाराम परब (बावकर) (वय-५५) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काल, मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.चौके स्थळकरवाडीत राहणारे दीपक परब (बावकर) हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. ते पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. काल, मंगळवारी रात्री ते घरी असताना अचानक पडवीला आग लागून घराने पेट घेतला. यावेळी शेजारील नागरिकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने दरवाजा उघडता आला नाही. याबाबत चौके पोलिस पाटील यांनी मालवण पोलिसांना घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. सुमारे तासभरानंतर आग आटोक्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील दीपक यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास मालवण पोलिस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग