शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या तिघांवर गुन्हा

By सुधीर राणे | Updated: January 25, 2023 12:32 IST

बसस्थानकासमोर सर्व्हिसरोडच्या बाजूला असलेल्या वीज खांबानजीक एक मृतदेह सापडला होता.

कणकवली: विजेच्या खांबाशी संपर्क आल्याने विजेचा तीव्र धक्का बसून बाळकृष्ण शांताराम तावडे (७०, कणकवली - टेंबवाडी) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखेर महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक मृत्यूंजय कुमार, इलेक्ट्रिशियन मिथिलेश कुमार आणि मनिषसिंह यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.     शवविच्छेदन अहवालात बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार पथदिपाची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या बिल्डकॉनच्या तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत बाळकृष्ण यांची पत्नी सुहासिनी हिने तक्रार नोंदविली आहे.याबाबत माहिती अशी, बाळकृष्ण तावडे हे २८ ऑगस्टला घरातून बाहेर पडले होते. ते उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. ९ सप्टेंबरला पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार देण्यात आली. तत्पूर्वी २९ ऑगस्टला बसस्थानकासमोर सर्व्हिसरोडच्या बाजूला असलेल्या वीज खांबानजीक एक मृतदेह सापडला होता. तो मृतदेह बाळकृष्ण तावडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालात बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले होते.    याप्रकरणी नगरसेवक शिशीर परुळेकर यांनीदेखील आवाज उठविला होता. त्यानुसार पोलिसांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधून संबधित वीज खांबाची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार वीज कार्यालयाकडून बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पोलिसांनी महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीशी पत्र्यव्यवहार केला व पथदीपाची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी कुणाची, याची विचारणा केली होती. या चौकशीनंतर पोलिसांनी दिलीप बिल्डकॉनच्या तिघांवर संगनमताच्या हयगयीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ३०४ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी