शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

दुचाकी अपघातातील एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:28 IST

वेताळबांबर्डे येथील महामार्गावर बुधवारी रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात ओरोस येथील मल्लापा लमाणी यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुचाकी अपघातातील एकाचा मृत्यू अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कुडाळ : वेताळबांबर्डे येथील महामार्गावर बुधवारी रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात ओरोस येथील मल्लापा लमाणी यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.या अपघाताबाबत कुडाळ पोलिसांनी माहिती दिली की, या अपघातातील मृत मल्लापा लमाणी हा मूळ कर्नाटक येथील असून तो बांधकाम कामगार होता. सध्या तो ओरोस येथे राहत होता. बुधवारी सावंतवाडी तालुक्यातील एका घराचे बांधकाम करून सायंकाळी उशिरा ओरोसच्या दिशेने येत होता.त्याच्या मागे दुचाकीवर ओरोस येथील पोलीस कर्मचारी नवलू कोकरे हे बसले होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वेताळ बांबर्डे पुलावरून जात असताना समोरून जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची धडक समोरून येणाऱ्यां दुचाकीला बसली. या अपघातात मल्लापा व कोकरे हे दोघेही खाली फेकले गेले.

यामध्ये मल्लापा गंभीर जखमी झाले तर कोकरे किरकोळ जखमी झाले. या अपघातादरम्यान तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून मल्लापा याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.

प्राथमिक तपासात मल्लापा याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, जीवितास धोका निर्माण होईल अशाप्रकारे दुचाकी चालवित ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मृत मल्लापा याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग