शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली महाविद्यालयात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:45 IST

कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभाग आणि( IQAC)अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने १८ एप्रिल २०२१ रोजी 'सामाजिक शास्त्रातील अत्याधुनिक अभ्यास प्रवाह' या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई- परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकणकवली महाविद्यालयात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद 'सामाजिक शास्त्रातील अत्याधुनिक अभ्यास प्रवाह' या विषयावर १८ एप्रिल रोजी आयोजन

कणकवली: कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभाग आणि( IQAC)अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने १८ एप्रिल २०२१ रोजी 'सामाजिक शास्त्रातील अत्याधुनिक अभ्यास प्रवाह' या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई- परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेत जगभरातून अभ्यासक आणि संशोधक सहभागी होऊन निबंध वाचन करणार आहेत. तसेच निवडक शोध निबंध नामांकित अशा शोध मासिकातून प्रकाशित करण्यात येणार आहेत.ही परिषद आंतरविद्याशाखीय असून अभ्यासकांना साहित्य, वाणिज्य,विज्ञान व सामाजिक शास्त्रातील वेगवेगळ्या उपघटकांवर आधारित शोधनिबंध सादर येतील‌ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्य संयोजक डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी दिली.

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बीजभाषक म्हणून श्रीलंका येथील सुप्रसिध्द संशोधक आणि भारतीय - श्रीलंकन संस्कृतीच्या अभ्यासिका,श्रीमती सुभाषिनी पदमनाथन यांचे मार्गदर्शन होणार आहे.तसेच अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मसुरी येथील जेष्ठ समाज शास्त्रज्ञा मेरी सायमन लुईकी या परिषदेत सामाजिक शास्त्रे,विज्ञान व भाषेचे अनुबंध या विषयावर व्याख्यान देतील. याबरोबरच बेंगलोर येथील 'नॅक'या राष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार विनिता साहू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.शामराव कोरेटी या परिषदेत सत्राध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत.या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई खोत, चेअरमन पी.डी.कामत,सचिव विजयकुमार वळंजू यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या एकदिवशीय परिषदेत देशभरातील अभ्यासक , संशोधकांचे दोन सत्रात शोध निबंध वाचन होणार असून परिषदेचे समन्वयक म्हणून डॉ.एस.एन.पाटील व डॉ.राजेंद्र मुंबरकर,सह समन्वयक प्रा.युवराज महालिंगे, संयोजन सचिव डॉ.सोमनाथ कदम आणि सह सचिव म्हणून डॉ. बी.एल.राठोड हे परिषदेची जबाबदारी सांभाळत आहेत.

कोकणात कणकवली सारख्या ग्रामीण भागात अशा पध्दतीने विविधांगी विषयावर होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेस उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्व अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक,व विद्यार्थी संशोधकांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य संयोजक तथा प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग