शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारूसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, बांदा सटमटवाडी येथे एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:01 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा- सटमटवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी चंद्रकांत संभाजी ओहोळ (४०, रा. पिंपरी, अहमदनगर) याला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदारूसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, बांदा सटमटवाडी येथे एक ताब्यातराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा- सटमटवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी चंद्रकांत संभाजी ओहोळ (४०, रा. पिंपरी, अहमदनगर) याला ताब्यात घेतले.मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, यू. एस. थोरात, आर. एस. शिंदे यांच्या टिमने मंगळवारी रात्रीपासून बांदा-सटमटवाडी येथे महामार्गावर सापळा रचला होता.या पथकाने बांदा-सटमटवाडी धाब्यासमोर (एम. एच. १६, बी. झेड. ७०५३) या संशयित कारला थांबण्याचा इशारा करीत ही गाडी तपासली. त्यावेळी या कारमध्ये एकूण ३ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचे अवैध गोवा बनावटी दारुचे ३० खोके आढळून आले.ही गोवा बनावटीची अवैध दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १० लाखांची कार असा एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवा बनावटीची विनापरवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारचालक ओहोळ याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग