शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना: सिंधुदुर्गात संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 15, 2023 18:55 IST

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. ...

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. आज संपाचा दुसरा दिवस असून, या संपात ९८ टक्के कर्मचारी सहभागी असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे, तसेच नागरिकांची कामेही खोळंबली आहेत.राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कर्मचाऱ्यांची एकजूट दाखविली, तर आजच्या दुसऱ्या दिवशी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत शासनाकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात सर्व संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडताना शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.प्रशासकीय कामकाज ठप्पराज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.

संप यशस्वी झाल्याचा दावाराज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील विविध ६२ कर्मचारी संघटनांचे सुमारे १७ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. कार्यालयामध्ये केवळ २ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे हा संप पूर्णपणे यशस्वी झाला असल्याचा दावा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन