शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 20, 2022 08:52 IST

Sindhudurg: विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग : विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे.

गोव्यातील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ जहाजातून होणारी तेल गळती अपघात ठिकाणापासून दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला पसरणार आहे. त्यामुळे देवगड, मालवण, वेंगुर्ला किनाऱ्याबरोबरच गोव्यातील किनारेदेखील बाधित होणार आहेत. तेलगळती आज पासून (दि.२०) अधिक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ५० वाव पाण्यात ‘पार्थ’ हे १०१ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झाले. रत्नागिरी कोस्ट गार्डकडून प्राप्त माहितीनुसार जहाजातून आज तेल गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ, पोलिस निरीक्षक सागरी सुरक्षा बल अनिल जाधव, वेंगुर्ल्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजर्षी सामंत सहभागी होते.

प्रतिबंधक उपाय जारीतेल गळती रोखण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या भागात २५० लिटर ऑईल स्पील डिस्परसंट (OSD) ची फवारणी हेलिकॉप्टरमधून केली आहे. तेल गळतीच्या ठिकाणी पॅण्डी (PANDI) क्लबच्या स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण