शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांच्या सूचना अधिकारी पाळत नाही, दीपक केसरकरांकडून घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:08 IST

हत्ती हटाव मोहीम फक्त अधिकाऱ्यांमुळेच रखडली

सावंतवाडी : वनमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतरही अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी माझा आग्रह असून लवकरच ही बाब वनमंत्र्यांच्या निर्देशानुसार आणून दिले जाईल. हत्ती हटाव मोहीम फक्त अधिकाऱ्यांमुळेच रखडली आहे. असा घरचा आहेर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, विद्याधर परब, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, दोडामार्ग, मांगेली येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. जीवितहानीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने दक्षता घेणे आवश्यक आहे. गवस कुटुंबाची मी लवकरच भेट घेणार आहे. हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचे ही केसरकर यांनी स्पष्ट केले.मांगेली-कुसगेवाडी विजेचा जोरदार धक्का लागून घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. महावितरण दक्षता घेणे आवश्यक असून हा अपघात कसा झाला याची चौकशी केली जाणार असल्याचे केसरकर म्हणाले. तसेच विजेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही केसरकर यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार आहे. हायवे लगत असल्याने पूर्णपणे अत्याधुनिक असे हे स्थानक होईल. दरम्यानच्या काळात येथे पडलेले खड्डे व डागडुजी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे हे स्थानक सावंतवाडीत उभे राहील, असा विश्वास  केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीकरांनी मला अनेक वर्षे प्रेम दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीची सत्ता नगरपालिकेत दिसेल, असेही म्हणाले.वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता आंबोलीत वन विभागाकडून पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. पर्यटकांना ये-जा करण्यासाठी याचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाशी चर्चा करून होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता घेतली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.