शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:27 IST

पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. हा आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देसावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार : विकास आराखड्यात चुकीच्या नोंदी

सावंतवाडी : पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. हा आराखडा मराठीत प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.येथील पालिका शहर प्रारूप विकास आराखडा प्रादेशिक विभाग नगररचना मुंबई यांनी प्रसिद्ध केला आहे. त्या आराखड्यामध्ये या शहराचा चुकीचा इतिहास नोंदविला गेला आहे. हा आराखडा मराठीत प्रकाशित करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून याबाबत तसेच चुकीच्या आरक्षण पद्धतीविरोधात शहरातील प्रसिद्ध बांधकामतज्ज्ञ डॉ. नागवेकर यांनी येथील पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन हरकत घेतली आहे.पालिका प्रारूप विकास आराखड्याचा मसुदा मराठीतून द्यावा म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व नागरिक यांनी मागणी करूनही त्याकडे नगररचना विभागाने साफ दुर्लक्ष करीत या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. पालिकेच्या दर्शनी भागामध्ये सावंतवाडी संस्थानचा इतिहास लिखित स्वरुपात नमूद आहे.

या संस्थानचा इतिहास नगररचना विभागाने चुकीचा लिहिताना त्यामध्ये शहरासाठी पहिली पाणीपुरवठा योजना १८९३ मध्ये राजेसाहेब रावबहादूर सखाराम बोहेडेकर यांनी सुरू केली आहे असा चुकीचा उल्लेख केला आहे. मुळात संस्थानात बोहेडेकर नावाचे कुणीही राजा नव्हते. त्याकडे डॉ. नागवेकर यांनी लक्ष वेधत शासनाची घोर चूक दाखवून दिली आहे.पालिका मुख्याधिकारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी नगरपरिषदेने निविदा काढली आहे. म्हणजेच नगररचना विभागाने त्याला मंजुरी दिली असताना पुन्हा आरक्षण क्रमांक ३० वर मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासाठी आरक्षण टाकले आहे.

शहरातील लोकसंख्या १५ हजार १२० इतकी होती. तर २००१ मध्ये २२,९०१ व २०११ मध्ये २३,८५१ एवढी होती. दहा वर्षात फक्त या लोकसंख्येमध्ये ९५० एवढी वाढ आहे. दरवर्षी लोकसंख्येत सरासरी ९५ एवढी वाढ होत आहे. २०२६ मध्ये हीच लोकसंख्या वाढून ती ३५ हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज डॉ. नागवेकर यांनी व्यक्त केला.या संस्थानचे मुख्य ठाणे यापूर्वी नरेंद्र डोंगरावर होते; परंतु आता नरेंद्र डोंगर पालिका हद्दीत नाही. वन विभागाच्या ताब्यात असणारा नरेंद्र डोंगर व त्यातील स्थानिक उद्याने यांचा अप्रत्यक्ष लाभ शहराच्या नागरिकांना होत आहे.शहराचा प्रारूप विकास आराखडा चुकीचा : नागवेकरशहराचे एकूण क्षेत्र ६७८ चौरस किलोमीटर आहे, असे आराखड्यात म्हटले आहे. तेही चुकीचे असल्याचे डॉ. नागवेकर यांनी दाखवून दिले. शहरात ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार २६ हजार ५६५ एवढी वाहने आहेत, असा उल्लेख अहवालात आहे. त्यामध्ये दुचाकी १९ हजार २६८, मोटरकार २०४४, जीप ४१९, रिक्षा १९३३, रुग्णवाहिका २२, ट्रक १००६, चारचाकी डिलीव्हरी व्हॅन ४५७, ट्रॅक्टर ६६ अशी एकूण आकडेवारी सांगत आहे.

२०१४ ते २०१६ या दोन वर्षांत वाहनांमध्ये आणखी वाढ झालेली असावी म्हणजेच माणसापेक्षा २७१४ वाहने जास्त आहेत, याकडे नागवेकर यांनी लक्ष वेधले. १९९१ मध्ये या शहराची लोकसंख्या २१ हजार ३०५ होती. २० वर्षांत २५४६ एवढी वाढ झाली आहे आणि वाहने प्रचंड वाढली असा या शहराचा प्रारूप विकास आराखडा सांगत आहे, ते चुकीचे असल्याचे डॉ. नागवेकर यांनी सांगितले. मराठी भाषेत विकास आराखडा दिला तर लोकांना हरकत घेण्यास सुलभ होईल, असेही डॉ. नागवेकर म्हणाले. 

 

 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग