शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात वाघांची संख्या पोहोचली आठवर, नव्या व्याघ्र गणनेत नाेंद : जंगलक्षेत्र घटतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:07 IST

दोडामार्ग तालुक्याच्या सीमेलगत, गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमा लागून असून, येथील जंगलक्षेत्रात वाघांचा मुक्त संचार वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनक्षेत्रात पाच वर्षांपूर्वी वाघांची नोंद शून्य होती. आता नव्या व्याघ्रगणनेत ती संख्या आठवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात जशी वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे, तशीच ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातही होत आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे प्रामुख्याने वास्तव्य जाणवत आहे. मात्र, येथील जंगलक्षेत्र हळूहळू नाहिसे झाले, तर भविष्यात माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातील अंतर कमी व्हायला वेळ लागणार नाही. 

दोडामार्ग तालुक्याच्या सीमेलगत, गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमा लागून असून, येथील जंगलक्षेत्रात वाघांचा मुक्त संचार वाढला आहे. येथील वनपरिक्षेत्रांतर्गत क्षेत्रात सोयी-सुविधांच्या अभाव असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत, तसेच वाघ पाण्यासाठी गावालगत येत असल्याने आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.

आंबोली ते दोडामार्ग सह्याद्री वनकाॅरिडोअर असला, तरी येथील वृक्षतोडीला आळा घालणे तेवढेच गरजेचे असून, या परिसरात वाघाचे अस्तित्व हे सतत जाणवत आहे. 

सोयी-सुविधांचा अभावदोडामार्ग तालुक्यांतील राखीव वनात सोई-सुविधांचा अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जंगलांचा विस्तार मोठा असून, गोवा-कर्नाटकच्या सीमा  लागून आहेत. वाघांची संख्या वाढली असल्याने वनविभागाकडून कठोर अंमलबजावणीची गरज आहे.

वाघांचे सध्या त्याचे ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, तेथे विपुल वनसंपदा आहे. पाणी आहे, तसेच शासनस्तरावर ही विविध उपाययोजना करण्यात येत असून, सह्याद्री वनकाॅरिडोरमुळे जंगलक्षेत्र सुरक्षित राहण्यास आणखी मदत होणार आहे. — सुनील लाड, सहायक वनसंरक्षक सिंधुदुर्ग 

टॅग्स :Tigerवाघ