शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध!, काही चाकरमानी महालय आटोपूनच परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:54 IST

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्गवासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचा एक दिवस शिल्लक असला तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. काही चाकरमानी गणेशोत्सव आटोपल्यानंतर मुंबईकडे परततील, तर काही जण महालय आटोपूनची मुंबईकडे जाणार आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध!काही चाकरमानी परतले : काही महालय आटोपूनच परतणार

सिंधुदुर्ग : गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्गवासीयांना महालयाचे वेध लागले आहेत.  महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. काही चाकरमानी मुंबईकडे परतले, तर काही जण महालय आटोपूनच मुंबईकडे जाणार आहेत.गणेश चतुर्थी दिवशी गणरायांची विधिवत स्थापना केल्यानंतर दीड , पाच ,सात , नऊ, आणी अकरा  दिवसांनी अनेक ठिकाणी गणरायाना निरोप देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी सतरा, एकविस ,बेचाळीस दिवसांनीही गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

मात्र, सिंधुदुर्गात महालयांना विशेष महत्त्व असते. पितृ पंधरवड्यात आपल्या पितरांच्या नावे तिथीनुसार पिंडदान करुन पितरांच्या आत्मांना शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. तर पितरांच्या नावाने नातेवाईक व ग्रामस्थांना महाप्रसाद वाढला जातो.

पितृपक्ष कालावधीत पितर धरतीवर येतात, त्यांना तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे. यावर्षी २६ सप्टेंबर पासून महालयाना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लोकांना महालयाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे.गणेश दर्शनासाठी येणाऱ्या जवळच्या नातलगांना या महालयासाठी निमंत्रण दिले जात आहे. तसेच यासाठी सामानाची यादी बनवून ते खरेदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करणे सुरू आहे.  

पुरोहितांना निमंत्रण देणे तसेच महालयाशी संबंधित इतर अनेक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी आलेले अनेक मुंबईकर महालय करुनच परतणार आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग