शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली शहरातील ‘दत्तकृपा’ कॉम्‍प्‍लेक्‍समधील सदनिकाधारकांना एसीबीकडून नोटिसा!

By सुधीर राणे | Updated: February 21, 2023 20:08 IST

संकुलातील रहिवाशांमध्ये खळबळ; वैभव नाईक यांनी बांधलेल्या इमारती आता लक्ष्य

कणकवली: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू असतानाच  कणकवली शहरात त्यांनी बांधलेल्या ‘दत्तकृपा’ कॉम्‍प्‍लेक्‍समधील काही सदनिकाधारकांना रत्‍नागिरी येथील एसीबी कार्यालयाने चौकशीसाठी नोटिसा पाठवल्‍या आहेत. त्यामुळे सदनिकाधारकांमध्ये खळबळ उडाली असून आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू असतानाच त्यांच्या आमदार निधीतून ज्या ग्रामपंचायतीला आमदार निधी दिला त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना तसेच काही विकास संस्था, मजूर संस्था यांना यापूर्वी एसीबीकडून चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंट मधील ५६ सदनिकाधारकाना एसीबीने चौकशीला हजर राहण्याबाबत नोटिसा बजावल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.  

या नोटीसमुळे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशी सुरू असताना त्यांच्या घराची देखील मोजमापे घेण्यात आली होती. आता या अपार्टमेंट मधील सदनिकाधारकांना  नोटिसा आल्यानंतर  त्यांनी आम्ही पूर्णपणे या चौकशीला सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतलीआहे. 

आमदार  नाईक यांनी बांधलेल्‍या सर्वच निवासी संकुलातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. ठाकरे गटात राहिलेल्‍या आमदार नाईक यांची रत्‍नागिरी एसीबीने चौकशी सुरू ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी नाईक यांचा बंगला, दुकान, पाईप कारखाना तसेच इतर मालमत्तांची मोजमापे घेण्यात आली. त्‍यानंतर नाईक यांचा आमदार निधी ज्‍या ग्रामपंचायतींना वितरीत झाला, त्‍या ग्रामपंचायतींच्या कामांचीही चौकशी एसीबीकडून सुरू करण्यात आली. तसेच काही विकाससंस्थांनाही एसीबीने नोटिसा बजावल्‍या. त्‍यानंतर आता आमदार नाईक यांनी बांधलेल्‍या बांधकरवाडी येथील दत्तकृपा संकुलातील ५६ फ्लॅटधारकांना चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत.

या नोटिसीमध्ये संबधित सदनिकाधारकांनी त्या सदनिका कशा खरेदी केल्या ? याबाबतची माहिती तसेच पॅनकार्ड, आधारकार्ड साेबत आणण्याचे नमूद केले आहे. कणकवली शहरातील बांधकरवाडी, मधलीवाडी, परबवाडी या भागात नाईक यांनी निवासी संकुले उभारली आहेत. यातील दत्तकृपा या संकुलातील ५६ धारकांना नोटिसा आल्‍याने आता उर्वरीत संकुलातील रहिवाशांमध्येही खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीVaibhav Naikवैभव नाईक