शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

टीईटी घोटाळ्यात अडकलेल्यांना शिक्षण क्षेत्रात नो एंट्री - शिक्षणमंत्री दीपक केसरकर

By अनंत खं.जाधव | Updated: August 16, 2022 19:08 IST

मंत्रिपदावर नाराज नाही, उलट या क्षेत्रात काम करण्यासाठी अधिकचा वाव

सावंतवाडी :  टीईटी घोटाळ्यात अडकलेले अधिकारी व कर्मचारी पुन्हा शिक्षण खात्यात येत असतील तर आपण त्यांना घेणार नाही. असे अधिकारी कर्मचारी आपल्याला शिक्षण खात्यात नको. शिक्षण क्षेत्र पारदर्शक राहिले पाहिजे त्यात भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभागाचे मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर ते काल, सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण मंत्रिपदावर नाराज नसून उलट काम करण्यास संधी मिळाली असल्याचे सांगितले.मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षण क्षेत्र हे बुद्धिवंत लोकांचे आहे. कोणताही विषय मांडत असताना तो अभ्यास पूर्ण मांडला पाहिजे या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना आहेत. या सर्व संघटना आपले विषय हे अभ्यासपूर्ण मानतात. त्यामुळे आपणही अधिकचा अभ्यास केला पाहिजे. सर्व मंत्र्याचे विभाग रविवारी जाहीर झाले आहेत.त्यामुळे मी मुंबईत गेल्यानंतर या विभागाचा कार्यभार स्वीकारेन तसेच अधिकाऱ्यांकडून विभागाची संपूर्ण माहिती करून घेईन त्यानंतरच मी या विषयात अधिक प्रगल्भतेने बोलू शकणार असे केसरकर म्हणाले.मंत्रिपदावर नाराज नाहीमला शालेय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी दिली आहे ती मी सक्षमपणे पार पाडणार असून खात्यावर अजिबात नाराज नाही. उलट या क्षेत्रात काम करण्यासाठी अधिकचा वाव आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक बुद्धिवंत लोक काम करतात त्यांच्याकडून ह्याबद्दल माहिती करून घेईन. या विभागाला न्याय कसा मिळवून देता येईल ते बघेन असे मंत्री केसरकर म्हणाले.पारदर्शक कारभाराबाबत प्रयत्न मध्यंतरी जो टीईटी घोटाळा झाला त्याबद्दल मला जरी पूर्ण माहिती नसली तरी यामध्ये शिक्षण विभागातील जे अधिकारी कर्मचारी समाविष्ट आहेत त्यांना पुन्हा शिक्षण विभागात घेता येणार नाही. शिक्षण विभागाचा कारभार हा पारदर्शक राहिला पाहिजे तसे माझे प्रयत्न राहतील.असे मत टीईटी घोटाळ्यावर बोलताना मांडले.कोकण पट्ट्यातील डोंगरदऱ्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीतप्रत्येकाला मुलभूत शिक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यातील डोंगरदऱ्या राहणारी मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. त्यांना शिक्षणाच्या विविध सोयी करून देण्यात येतील. मध्यवर्ती ठिकाणी आश्रम शाळा किंवा इतर निवास व्यवस्था करण्यात येईल असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Education Sectorशिक्षण क्षेत्र