शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 05:17 IST

महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे. त्यामुळे यापुढे कोकणात कोणताही विनाशकारी प्रकल्प येवू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, रद्द झालेला नाणार रिफायनरी प्रकल्प रोह्यात होणार की नाही, यावर भाष्य टाळले.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, खासदार नारायण राणे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, चिपीच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. हे विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल.>जठारांचा राजीनामा फाडलानाणार प्रकल्प रद्द केल्याने संतप्त झालेले भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवला; मात्र मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा फाडून टाकला आणि फाडलेल्या कागदाचे तुकडे माजी आमदार राजन तेलींच्या हाती सोपविले. त्यामुळे जठार राजीनामा नाट्य औटघटकेचे ठरले आहे.>राणेंचे स्वप्न केसरकर पूर्ण करत आहेतचिपी विमानतळ व्हावा हे नारायण राणेंचे स्वप्न असून ते पूर्ण करण्याचे काम दीपक केसरकर हे करीत आहेत आणि माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच एकच हशां पिकला.>कोकणीपण हरवूदेऊ नका : राणेनारायण राणे म्हणाले, आता येथून लवकरच विमानसेवा सुरू करावी. नाणार रद्द केला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. कोकणात क्रांती करा, पण कोकणीपण हरवू देऊ नका.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे