शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

नीतेश राणेंनी अज्ञान प्रकट करु नये

By admin | Updated: December 28, 2015 00:42 IST

वैभव नाईक : नियोजन निधीबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे

कणकवली : जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्या जबाबदारीनेच विधीमंडळात विविध १८ प्रश्न पटलावर आणले. त्यातील ५ प्रश्नांवर चर्चाही झाली. राज्यात सर्वांत जास्त मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली असे सांगून आमदार नीतेश राणेंनी टीका करताना आपले अज्ञान प्रकट करू नये, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले.आमदार नीतेश राणे यांनी आमदार नाईक यांच्यावर अधिवेशनातील कामकाजावरून टीका केली होती. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार नाईक यावर म्हणाले की, मोंड-वानिवडे पुलाबाबत एकदा तारांकित प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुन्हा त्यावर अर्धा तास चर्चा मागून घेतली. जिल्हा नियोजनमधील अपुरा निधी मोंड पुलासाठी वापरण्यापेक्षा नाबार्डमधून घेणे संयुक्तिक आहे. हे आमदार नीतेश राणे यांना कळत नाही. त्यांनी जिल्हा नियोजनच्या निधीबाबत सतीश सावंत यांच्यासारख्या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे. हक्कभंगाबाबत आमदार राणे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. सभागृहाबाहेर केलेल्या वक्तव्यांबाबत हक्कभंग आणता येत नाही. नारायण राणे यांनी कित्येक वर्षे विधीमंडळात कामकाज अनुभवले असल्याने आमदार राणे यांच्याकडून असे विधान अपेक्षित नाही. पारंपरिक मच्छिमारांचा प्रश्न कोकणातील सर्व आमदारांच्या सहकार्याने मी सभागृहात मांडला आणि सविस्तर चर्चा घडवून आणली. त्याबद्दल मच्छिमारांनी माझा सत्कार केला. त्याबद्दल आमदार राणे यांना दु:ख का वाटावे? हे समजू शकत नाही. महामार्ग चौपदरीकरणाविरोधात नीतेश राणे यांनी वर्षभरापूर्वी आंदोलनाची भूमिका घेतली होती. आता सात-बारावर नोंदही झाली. तोपर्यंत आमदार राणे झोपले होते काय? असा प्रश्न करून प्रकल्पग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींंनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार नाईक म्हणाले. देवगडमधील रिक्षाचालक संदीप कावले याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आम्ही कावले कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. परंतु आंदोलनादरम्यान मतदारसंघाचे आमदार गोव्यात मौजमजा करत असताना देवगडमधील स्थानिक कार्यकर्त्यांना उगाचच भडकावत होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात कारवाई होणे योग्य आहे. परंतु अनुचित प्रकार टाळणे आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ठरते, असे आमदार नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)मत्स्य विभागासाठी अडीच कोटीमच्छिमारांमधील वादामध्ये गस्तीनौकांचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आतापर्यंत त्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात येत होती. आता पुरवणी मागण्यांमध्ये अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील रस्ते, साकव दुरूस्तीसाठी ३.६३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देवगड ग्रामीण रूग्णालयासाठी १६ लाख आणि कुडाळ ग्रामीण रूग्णालयासाठी ४५ लाखांची तरतूद झाली आहे. तर कुडाळ येथील महिला रूग्णालयासाठी ९० लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.