शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणार - नीतेश राणे

By admin | Updated: February 13, 2017 21:30 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर यांचा 'थंड भ्रष्टाचार' आम्हाला पहायला

ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 13 - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉपी टेबल बुकच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर यांचा 'थंड भ्रष्टाचार' आम्हाला पहायला मिळाला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच या कॉपी टेबल बुकची निविदा नारायण राणे पालकमंत्री असताना काढण्यात आलेली होती. असे जर केसरकर म्हणत असतील तर मग या निविदेच्या दरात साडे सात लाखांची वाढ का करण्यात आली. त्याला मंजूरी कोणी दिली? याबाबत त्यांनी जनतेसमोर खुलासा करावा असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी दिले आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नगरसेवक समीर नलावडे, अण्णा कोदे उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले, नारायण राणे पालकमंत्री असताना निविदा काढली म्हणजे भ्रष्टाचार झाला का? असे होत नाही. तसे जर असेल तर केसरकर आता पालकमंत्री आहेत . त्यांच्या काळात अनेक कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. त्या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असे आम्ही म्हणायचे का? असा प्रश्न आमदार राणे यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, या कॉपी टेबल बुकची संकल्पना नारायण राणे यांची होती. त्या पुस्तकात त्यांचा फोटो किंवा अभिप्राय तरी घेतलेला आहे का? एवढ्या 'मॅनर्स' तरी पाळायला नकोत का? नारायण राणे यांना ते पुस्तक पाठविण्याचा प्रयत्न झाला का? तसेही नाही. या माध्यमातून घाणेरडे राजकारण केले गेले आहे.या पुस्तकाची मूळ निविदा 25 लाखांची होती. केसरकर पालकमंत्री झाल्यावर त्यात साडे सात लाख रुपयांची वाढ करण्यात आली. असे का झाले? याचा त्यानी खुलासा करावा.या पुस्तकाच्या छपाई नंतर प्रत्येकी 1800 रूपये असे 84 लाख 60 हजार रूपये इतकी रक्कम शासनाकड़े जमा व्हायला हवी होती. त्यापैकी किती जमा झाली ? 262 पुस्तके दीपक केसरकर यांनी वाटली आहेत. त्याची सुमारे 5 लाख रूपये किंमत होते. ती त्यानी जमा केली का? पुस्तके छापली किती? वाटली किती? ज्यांच्या नावे ती पाठविली त्यांना मिळाली का? याबाबत प्रशासनाकडे काहीच माहिती उपलब्ध नाही.सर्वच गौड़ बंगाल आहे.हे पुस्तक नाशिक, पुणे येथे छापता आले असते. मात्र, त्याची छपाई हैद्राबादला का करण्यात आली? याची उत्तरे त्यानी द्यावीत. जिल्हाधिकाऱ्यानी पारदर्शक कारभार दाखवायचा असेल तर कोणाच्या दबावाला बळी न पड़ता या प्रकरणाची चौकशी करावी. लाच लुचपत प्रतीबंधक विभागाकडे आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.पारदर्शक कारभाराची शासन राज्यभर बोंबाबोंब करीत आहे. तर या प्रकरणाचे खुलासे पालकमंत्र्यानी करावे.असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.(प्रतिनिधी)पक्षप्रमुखांबाबत हाच आदर का?शिवसेनेच्या मंत्र्यानी राजीनामे देण्याबाबत विचार करावा. जरा संयमाने घ्यावे असे केसरकर सांगतात. त्यांचे पक्ष प्रमुख आपला स्वाभिमान जपत मंत्र्याना राजीनामे द्यायला सांगतात. असे असताना पक्ष प्रमुखांच्या स्वाभिमाना बद्दल केसरकराना काय किंमत आहे. ते या वक्तव्यातून दिसून येते. भाजपला पोषक अशी भूमिका ते घेत असून मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहेत.हे यातून सिध्द होते. त्यामुळे जुन्या शिवसैनिकानी याचा विचार करावा. अन्यथा 2019 मधील विधानसभा निवडणूकित सिंधुदुर्गात दीपकसेना विरुध्द शिवसेना असा सामना त्यांना बघायला मिळेल.असे आमदार राणे यावेळी म्हणाले. हक्कभंग आणण्याची वेळ आणू नका!शरद पौंक्षे यांच्या नाटकासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला. त्याला किती खर्च आला? तो दिला गेला का? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चार आठवडे उलटूूनही माहिती दिली नाही. आमदारानी मागितलेली माहिती 30 दिवसाच्या आत न दिल्यास संबधित अधिकाऱ्यावर हककभंग आणता येतो. तशी वेळ आणू नका.असा इशारा आमदार राणे यांनी यावेळी दिला. खासदारांनी उत्तर द्यावे!शिवसेना भवनवर पक्ष प्रमुखांकडे सिंधुदुर्गातील 150 जागांवरील उमेदवारांची यादी शिवसेनेने पाठविली आहे. मात्र, येथे तेवढे उमेदवार उभे न करता भाजप बरोबर छुपी युती केली आहे. हा पक्ष प्रमुखांचा अवमान नव्हे का? याबाबत खासदार विनायक राऊत यांनी उत्तर द्यावे. आमची डोकी भ्रष्ट झाली आहेत.असे ते म्हणतात मग खंबाटा मधील भ्रष्टाचार कोणी केला आहे? या कंपनीत कोकणातीलच जास्त माणसे आहेत. मराठी माणसासाठी शिवसेना या घोषवाक्याला आता काय अर्थ राहिला आहे. हे त्यानी सांगावे.