शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही -  वैभव नाईक

By सुधीर राणे | Updated: February 17, 2024 15:28 IST

शिवसेनेत एकनिष्ठेने काम करतो त्यांचा नितेश राणेंना पोटसुळ; मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही

कणकवली: मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करतो. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ उठत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियोजित दौ-यामध्ये कणकवली शासकीय विश्रामगृहावर मी त्यांना विकासकामांसदर्भात अधिका-यांसमोरच भेटलो. माझ्या निष्ठेवर नितेश राणेंना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ते गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. कणकवली येथील विजयभवन येथे आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी कुठलीही सत्ता शिवसेनेबरोबर नव्हती. त्यानंतर दोन वेळा मी आमदार झालो आहे. लोकांनी माझ्या निष्ठेवर विश्वास ठेवल्यामुळेच मी आमदार झालो आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. येणा-या काळामध्ये सुध्दा उध्दव ठाकरेंसोबतच मी राहणार आहे. हे मला वारंवार नितेश राणेंसारखे सांगण्याची काही गरज नाही. कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष बदलत असतात. त्यांनी स्वत: पहिली निवडणूक कॉग्रेसच्या चिन्हावर लढवली. दुसरी विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवली. त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणे कुटुंबिय असतात, अशी टिका आमदार वैभव नाईक यांनी केली.सत्ता आणि राणेंचे जवळचे नाते आहे. त्यामुळे राणेंचा निष्ठेशी कुठलाही दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे नितेश राणेंनी आमच्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा १५ वर्षांत आपण किती पक्ष बदलले ? ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या त्या पक्षांमध्ये ते गेले. त्यामध्ये शिवसेना , कॉग्रेस,भाजप या पक्षांचा समावेश आहे. त्या सगळ्या सत्तेचा वापर करुन आज पुन्हा ते  सत्तेसाठीच प्रयत्नरत आहेत.असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे