शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा फोन; सिंधुदुर्गात दहा वर्षानंतर पुन्हा राणे राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:38 IST

भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

महेश सरनाईक

सिंधुदुर्ग :कणकवली विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना रविवारी सकाळी मंत्रीपदासंबंधी फोन केल्यामुळे भाजपच्या कोट्यातून नितेश राणे मंत्री होणार आहेत.त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात येत असून २०१४ नंतर सिंधुदुर्गात पुन्हा एकदा  राणे राज्य सुरू होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राणे मंत्री होणार असल्याने तेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहेत.

नितेश राणे आमदार नितेश राणे यांनी  नुकत्याच झालेल्या विधानसभा  माझे उपक्रमनिवडणुकीत विजयाची हॅट्रिक नोंदवली होती. त्यांनी उद्धवसेनेच्या संदेश पारकर यांचा 58 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्री पद मिळणार असे जवळपास निश्चित होते. त्यातच नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन गेले दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली होती. हिंदूत्वाचा नारा देत संपूर्ण महाराष्ट्रात  गेल्या दोन वर्षात आपली वेगळी छापून ठेवली होती. 

 स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या आमदार नितेश राणे यांनी २०१४ साली  विधानसभेच्या कणकवली मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार म्हणून विधानसभेत एन्ट्री केली होती. त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबवित प्रसंगी जन-सामान्यांसाठी रस्त्यावरील लढाई लढली होती.

शेकडो कार्यकर्ते नागपूरमध्ये

 आमदार नितेश राणे यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते  सिंधुदुर्गातून नागपुरात दाखल झाले आहेत. यात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,  भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  संदेश वर गोट्या सावंत,  समीर नलावडे,  मिलिंद मेस्त्री,  संदीप मेस्त्री,  मनोज रावराणे,  बंडू गांगण, मेगा गांगण. संदीप सावंत, दिलीप तळेकर, बंड्या नारकर, सुभाष मालंडकर, समीर प्रभूगावकर, प्रज्वल वर्दम यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

आमदार नितेश राणे प्रोफाईल 

जन्म ----- २३ जून १९८२

शिक्षण ------ MBA शालेय जीवन - स्वामी विवेकानंद हायस्कुल चेंबूर इथे १० वी पर्यंत शिक्षण. पुढील MBA पर्यंतचे शिक्षण लंडन येथे झाले.

आई - सौ. नीलम नारायण राणे 

वडील - श्री. नारायण तातू राणे ( खासदार )

पत्नी - सौ. ऋतुजा नितेश राणे 

अपत्य - एक मुलगा चि. निमिष नितेश राणे

नितेश राणे २००५ मध्ये लंडन मधून भारतात परत आले त्याच वेळी नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड करून बाहेर पडले होते.२००६ - स्वाभिमान संघटनेची स्थापना

स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक कार्य उभे केले. २००९ मध्ये मुंबई पालिकेवर भव्य मोर्चा काढून आपल्या ताकदीची सर्वांना दखल घ्यायला लावली. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून २०११ साली घेतलेल्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवशी २५ हजार ३०० लोकांना नोकरीं देऊन गिनीज बुक of वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. वेळोवेळी विविध विषय मुद्दे घेऊन आंदोलने उभारली. स्वाभिमान संघटना राज्यभर वाढवली.

२०१४ - काँग्रेस पक्षातून कणकवली विधानसभेतून पाहिल्यांदा आमदार 

२०१५-१६ मराठा आरक्षणसाठी राज्यभर दौरे करून विशेष भूमिका बजावली..

२०१९ - भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश २०१९ - भाजपातर्फे दुसऱ्यांदा कणकवली विधानसभेतून आमदार 

२०२२-२३- राज्यभर हिंदू जन आक्रोश मोर्चे काढून हिंदुत्वाचा महाराष्ट्रातील बुलंद आवाज अशी ओळख निर्माण केली.

२०२४ - सलग तिसऱ्या वेळी भाजप तर्फे कणकवली विधानसभेतून आमदार पदी विजयी

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे