शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

नीतेश राणेंसह ५८ जणांना अटक, सुटका

By admin | Updated: January 15, 2016 00:45 IST

देवगडात काँग्रेसचे आंदोलन : आरोग्य यंत्रणेविरोधात मोर्चा; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या चुकीमुळे डिसेंबरमध्ये संदीप कावले या युवकाचा मृत्यू झाला होता. यावेळी काँग्रेसने आरोग्य यंत्रणेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस कार्यालय ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या मनाई आदेशामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते आमदार नीतेश राणेंसह ५८ जणांना ताब्यात घेत दुपारी त्यांची सुटका करण्यात आली.देवगडमधील संदीप कावले या रुग्णाच्या मृत्यूनंतर आमदार नीतेश राणे यांनी ९ जानेवारीला देवगडचे सुपुत्र असलेले राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी शिवसेनेने काँग्रेसविरोधात प्रतिआंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नियमन आदेश काढले होते. त्यामुळे ९ जानेवारीचे आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र, हे आंदोलन १४ जानेवारीला छेडण्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. प्रशासनाने पुन्हा जिल्ह्यात मनाई आदेश लावले आहेत; असे असतानाही ठरल्याप्रमाणे काँग्रेसने आंदोलन केलेच. मात्र, हे आंदोलन आरोग्यमंत्री यांच्या वळिवंडे येथील बंगल्यासमोर न करता ते ग्रामीण रुग्णालय देवगड येथे करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, सुदन बांदिवडेकर, मिलिंद कुलकर्णी, महिला आघाडीप्रमुख प्रणिता पाताडे, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, जनार्दन तेली, माजी सभापती मनोज सारंग, मेघा गांगण, संजय बोंबडी, योगेश चांदोस्कर, बाळ खडपे, आदी पदाधिकारी सहभागी होते. आंदोलनानंतर आमदार नीतेश राणे यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपस्थित असलेल्या जिल्हा चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये मृत संदीप कावले यांच्या कुटुंबीयांना नोकरीत घेण्याच्या मागणीसह व देवगड येथे अनुभवी डॉक्टर्स व विशेषत: स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांची उपलब्धता प्राधान्याने करावी. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असून, ही पदे भरण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करावा. जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्स शासकीय सेवेत येण्यासाठी ग्रामीण भागासाठी वेगळे आरोग्य धोरण असावे व अशा तज्ज्ञ डॉक्टरांसाठी विशेष सवलती व इन्सेंटिव्हज देण्यात यावीत. अशा मागण्या केल्या आहेत. कडक पोलीस बंदोबसआंदोलनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २० पोलीस अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वळिवंडे येथील बंगल्यासमोरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवगड ग्रामीण रुग्णालय परिसरात पोलिसांमुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी)आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नीतेश राणेनीतेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळत चाललेली आहे. याकडे जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आरोग्यमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. रुग्णांना उपचारांअभावी प्राण गमवावे लागत आहेत. आरोग्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वांत कमी डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. ही एक गंभीर परिस्थिती असताना आरोग्यमंत्री कोणतीही उपाययोजना करीत नाहीत. यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना जिल्ह्यातून बाहेर जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा आमदार राणे यांनी दिला.