शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू, विनामास्क फिरल्यास आता 500 रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:29 IST

corona virus Sindhudurngews- जिल्ह्यातील सर्व सार्जवनिक ठिकाणी, आस्‍थापना, समारंभ, कार्यक्रमाचे ठिकाणी मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. मास्‍क, रुमाल न वापरल्‍यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीविनामास्क फिरल्यास आता 500 रुपये दंड

सिंधुदुर्ग : जिल्‍हयात रात्री 11.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

जिल्ह्यातील सर्व सार्जवनिक ठिकाणी, आस्‍थापना, समारंभ, कार्यक्रमाचे ठिकाणी मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. मास्‍क, रुमाल न वापरल्‍यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्‍यक्‍तींकडून 1 हजार रुपये दंडाची रक्‍कम महसूल, पोलीस व स्‍थानिक प्राधिकरण वसूल करतील. मास्‍क जवळ बाळगून त्‍याचा वापर न करणे, किंवा योग्‍य रितीने वापर न करणे या बाबी सुध्‍दा मास्‍कचा वापर न करणे, याप्रमाणे समजण्‍यात येऊन दंड आकारण्यात येईल.

लग्‍न समारंभ फक्त 50 व्‍यक्‍तीच्‍या उपस्थितीत पार पाडता येईल. त्यासाठी संबंधित तहसिलदारांची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक आहे. सांस्‍कृतिक कार्यक्रम, क्रीडास्‍पर्धा, यात्रा, जत्रा, उरुस इत्‍यादीचे फक्त धार्मिक विधी फक्त 50 व्‍यक्‍तींच्‍या मर्यादेत करता येतील. त्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्‍हयातील आठवडी बाजार हे स्‍थानिक प्राधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय भरवता येणार नाहीत. पर्यटन स्‍थळे, आठवडा बाजाराची ठिकाणे, सर्व सार्वजनिक, धार्मिक स्‍थळे, उद्याने, मोकळया जागा, मनोरंजन पार्क, क्रीडांगणे, समुद्र किनारे इत्‍यादी ठिकाणी एकाचवेळी 50 पेक्षा जास्‍त लोकांना एकत्र येण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला आहे.कोव्‍हीड 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित स्‍थानिक प्राधिकरण यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. सदर पथके सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांचे ठिकाणी भेटी देवून कोव्‍हीड -19 बाबत तरतूदींचा भंग होत असल्‍यास दंडात्मक कारवाई करतील. अतिथी, ग्राहकांनी वापरलेली फेस कव्‍हर, मास्‍क, हातमोजे यांची संबंधितांनी योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग