शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवख्यांना मंत्री केले, मग नारायण राणेंना का डावलले?, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल 

By अनंत खं.जाधव | Updated: June 11, 2024 13:32 IST

'राणेंना मंत्री करणार म्हणून सांगून राज ठाकरे, दीपक केसरकर यांनी मते मागितली आता काय झाले'

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाने राणेंसह अवघ्या कोकणी जनतेचा अपमान केला, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे. त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांसारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र राणेंना त्या ठिकाणी संधी देण्यात आली नाही. याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. डाॅ.परूळेकर म्हणाले,पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी दिल्ली येथे पार पडला. यावेळी मोदींसोबत भाजप व एनडीएच्या ७२ जणांनी मंत्रीपदी आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र या सोहळ्यात सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. साडेचार लाख मते देऊन येथील जनतेने लोकसभेत पाठवलेल्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारून मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने कोकणातील जनतेचा अवमान केलेला आहे.

मोहोळ आणि खडसे सारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांची वर्णी मात्र मंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहीलेल्या नारायण राणे यांना डावलून मोदी आणि पक्षनेतृत्वाने राणेंचा आणि येथील जनतेचा अपमानच केलेला आहे, राणेंना मंत्री करणार म्हणून सांगून राज ठाकरे, दीपक केसरकर यांनी मते मागितली आता काय झाले असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे ministerमंत्री